
अक्षय बडवे, प्रतिनिधी...
Pune News Update: जनावरांची कत्तल रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांना जमावाकडून धक्काबुक्की झाल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. पुण्यातील कोंढवा भाग परिसरात ही घटना घडली असून धक्काबुक्की करणाऱ्या 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात दाखल करण्यात आला आहे. (Pune Latest Crime News)
याबाबत अधिक माहिती अशी की, कोंढवा (Kondhava) परिसरातील मिठानगर भागात पत्राच्या शेडमध्ये पशुसंवर्धन विभागाचा कोणताही परवाना नसताना जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक कारवाई करण्यासाठी त्या ठिकाणी गेले. (Latest Marathi News)
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच कारवाईला विरोध करण्यासाठी १० ते १५ लोकांनी बेकायदेशीर जमाव जमवला. त्यानंतर शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करून पोलिसांच्या अंगावर धावून जात त्यांनाच धमकी दिल्याचाही प्रकार केला.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी घटनास्थळावरुन पोलिसांनी अंदाजे 20 ते 25 किलो मास, मास कटिंगचे लोखंडी सामग्री आणि इतर साहित्य जप्त केले आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (Pune Police)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.