राज्यात सुरू असलेलं द्वेषाचं राजकारण थांबलं पाहिजे - श्रीकांत शिंदे

खासदार श्रीकांत शिंदेंकडून शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध
राज्यात सुरू असलेलं द्वेषाचं राजकारण थांबलं पाहिजे - श्रीकांत शिंदे
राज्यात सुरू असलेलं द्वेषाचं राजकारण थांबलं पाहिजे - श्रीकांत शिंदेSaamTvNews

कल्याण : कल्याण पूर्वमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन मंगळवारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून या जागेची पाहणी खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी आज केली. यावेळी खासदार शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याविरोधात नाराजी व्यक्त केली आणि सांगितले की राज्यात सुरू असलेल द्वेषाचे राजकारण थांबले पाहिजे.

हे देखील पहा :

तर दुसरीकडे टपाल कार्यालयांना कनेक्टिव्हीटी करण्यासाठी इंटरनेट (Internet) सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांबरोबर इतर कंपन्यांची सेवा घेण्याचीही मुभा या कार्यालयांना द्यावी नाहीतर प्रायव्हेट सेवा पोस्ट ऑफिस मध्ये सुरू करावे अशी मागणी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचे कल्याण पूर्वेतील प्रभाग समिती 'ड' कार्यालयाच्या आवारात भव्य स्मारक उभारले जाते आहे. त्याचा भूमीपूजन सोहळा मंगळवार १२ एप्रिल रोजी होणार आहे.

राज्यात सुरू असलेलं द्वेषाचं राजकारण थांबलं पाहिजे - श्रीकांत शिंदे
XE Variant : चिंता वाढवणारी बातमी, मुंबईत आढळला एक्सई व्हेरीयंटचा रुग्ण!

खासदार शिंदे यांच्या प्रयत्नाने स्मारकासाठी आवश्यक जागेचे खुप कमी वेळेत आरक्षण बदलण्यात आले होते. तर नगरविकास विभागाच्या माध्यमातून निधीही दिला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते या स्मारकाचे भूमिपूजन मंगळवारी होणार असून आज सायंकाळी खासदार शिंदे यांनी स्मारकाच्या जागेची पाहणी केली. यावेळी रिपाई नेते अण्णा राेकडे, देवचंद अंबादे, शिवसेनेचे माजी नगरसेवक निलेश शिंदे, महेश गायकवाड, आदी उपस्थित हाेते.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com