संभाजीराजे म्हणाले, राज्यसभेत फक्त इंटेलेक्च्युअल लोक असतात; म्हणून...

Yuvraj Sambhajiraje Chhatrapati Latest News : विकासकामं करण्यासाठी राजसत्ता हवी असते असं ते म्हणाले आहेत.
संभाजीराजे म्हणाले, राज्यसभेत फक्त इंटेलेक्च्युअल लोक असतात; म्हणून...
The Rajya Sabha consists of only intellectuals said Chhatrapati Sambhaji RajeSaam Tv

पुणे: संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Bhosale) यांनी पुण्यातल्या पत्रकार परिषदेत आज दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. एक म्हणजे ते राज्यसभेची निवडणूक (RajyaSabha Election) अपक्ष लढणार आहेत, तर दुसरी घोषणा म्हणजे त्यांनी 'स्वराज्य' या नव्या संघटनेची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी राज्यसभेत पुन्हा जाण्याची म्हणजेच खासदार होण्याची इच्छा व्यक्त केला आहे. (The Rajya Sabha consists of only intellectuals said Chhatrapati Sambhaji Raje)

राज्यसभेत फक्त इंटेलेक्च्युअल लोक असतात म्हणून मला राज्यसभेत जायचंय. ते म्हणाले, राज्यसभा मला आवडते म्हणुन माझी राज्यसभेवर जायची इच्छा आहे. राज्यसभेत इंटेलेक्चुअल लोक असतात. इंटेलेक्चुअल लोकांत जायला कुणाची काय हरकत आहे असं संभाजीराजे म्हणाले आहेत.

हे देखील पाहा -

संभाजीराजे म्हणाले की, जुलैमध्ये राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होणार आहेत. मी राज्यसभेची निवडून निश्चित लढवणार आहे. राज्यसभेची निवडूक मी अपक्ष म्हणून लढवणार आहे. मी जे काम केलं आहे, ते समाज हिताचं आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवार म्हणून मला सर्वांनी मला पाठिंबा दिला पाहिजे.

फक्त छत्रपती घराण्याचे वंशज म्हणुन नाही, तर मी केलेल्या कामामुळे मला पाठिंबा द्या असं आवाहन त्यांनी अपक्ष आमदारांना केलं आहे. त्याचप्रमाणे मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी अपक्ष उमेदवार म्हणून राज्यसभा निवडणूक लढवणार असा उल्लेख त्यांनी केला.

पुढे ते म्हणाले की, मी नेहमी शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या ऑयडोलॉजी प्रमाणे काम केलं. ५ मे ला मी आजाद मैदानावर गेलो आणि तिथे मला मराठा समाजातील समन्वयकांनी मला विनंती केली की तुम्ही स्टेजवर जावं. तिथे कुणी जायला तयार नव्हतं तेव्हा मी त्या व्यासपीवर गेलो. तेव्हा मराठा समाज शांत झाला.

नाहीतर तिथे काय घडलं असतं हे तुम्हाला सांगायची गरज नाही. पण भाजपला वाटलं मी भाजप विरोधात भुमिका घेतली. मात्र माझी भूमिका राष्ट्रपती नियुक्त खासदार असल्यामुळे मी समाजाच्या हिताची भुमिका घेतली असंही संभाजीराजे म्हणाले आहेत.

The Rajya Sabha consists of only intellectuals said Chhatrapati Sambhaji Raje
'भाजप म्हणणार का पटोलेंनी पाठीत खंजीर खुपसला'; अजित पवारांचा टोला

यावेळी संभाजीराजेंनी आपल्या पत्रकार परिषदेत सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Modi) आभार मानले. खासदारकीसाठी संधी दिली त्यासाठी त्यांनी मोदीचे आभार मानले तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही त्यांनी आभार मानले आहेत.

Edited By -Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.