मुंबईला पाणीपुरवठा करणारा सर्वात लहान तुळशी तलाव तुडुंब भरला

बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रात असणाऱ्या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा ‘तुळशी तलाव’ आज दिनांक १६ जुलै २०२१ रोजी सकाळी ११ वाजता पूर्ण भरुन वाहू लागला आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणारा सर्वात लहान तुळशी तलाव तुडुंब भरला
मुंबईला पाणीपुरवठा करणारा सर्वात लहान तुळशी तलाव तुडुंब भरलासुमित सावंत

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या आणि बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातच असणाऱ्या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा ‘तुळशी तलाव’ आज दिनांक १६ जुलै २०२१ रोजी सकाळी ११ वाजता पूर्ण भरुन वाहू लागला आहे. गेल्या वर्षी २७ जुलै २०२० रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास हा तलाव भरुन वाहू लागला होता. बृहन्‍मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव असून यातून दररोज सरासरी १८ दशलक्ष लीटर (१.८ कोटी लीटर) एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

हे देखील पहा -

तुळशी तलावाबाबत संक्षिप्त माहिती

हा तुळशी तलाव बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे ३५ किलोमीटर अंतरावर आहे.

हा कृत्रिम तलाव असून याचे बांधकाम सन १८७९ मध्ये पूर्ण झाले.

या तलावाच्या बांधकामासाठी जवळपास ४० लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता.

ह्या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे ६.७६ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे १.३५ चौरस किलोमीटर एवढे असते.

हा तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्‍त पाणीसाठा हा ८०४.६ कोटी लीटर (८०४६ दशलक्ष लीटर) एवढा असतो.

हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे विहार तलावाला जाऊन मिळते.

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com