शिंदे सरकारचे भवितव्य ठरवणारी, सर्वोच्च न्यायालयातील उद्याची सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता

राज्यासह संपुर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेली उद्याची सुनावणी आहे, या सुनावणीवरती राज्य सरकारच भवितव्य अवलंबून आहे.
chief minister Eknath Shinde Group
chief minister Eknath Shinde GroupSaam TV

मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार नसल्याची शक्यता वर्तवली जातं असून याबाबतची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकार स्थापनेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सरन्यायाधीशांच्या पीठापुढे सोमवारी होणारी सुनावणी टळली असल्याचं समोर येत आहे.

राज्यासह संपुर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेली उद्याची सुनावणी असून या सुनावणीवरती राज्य सरकारच भवितव्य अवलंबून आहे. शिवसेनेतून बंड करुन बाहेर पडलेल्या शिंदे गटाने राज्यघटनेतील दहाव्या परिशिष्टातील तरतुदीनुसार इतर पक्षात प्रवेश न केलं नसल्याने त्यांना अपात्र ठरवत या आमदारांच्या पाठिंब्यावर राज्यात सत्तेवर आलेले सरकार घटनाबाह्य ठरवावे.

पाहा व्हिडीओ -

या प्रमुख मागण्यांसह विविध मुद्द्यांना आव्हान देणाऱ्या याचिका शिवसेनेने (Shivsena) तर अपात्रतेच्या नोटीशींना आव्हान देणाऱ्या व अजय चौधरींच्या गटनेतेपदी नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिका शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या असून या सुनावणीवरती उद्या सुनावणी होणार होती मात्र आता ती उद्या होणार नसल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

शिवसेनेचे वकील सुनावणीची तारीख निश्चित करण्यासाठी सोमवारी सरन्यायाधीश एन.व्ही. रामण्णा यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठापुढे विनंती करणार असल्याचीही माहिती समोर येत आहे. या सर्व याचिकांवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला यांच्या सुटीकालीन खंडपीठाने ११ जुलै रोजी सुनावणी निश्चित केली होती.

आता सर्वोच्च न्यायालयाची सुट्टी संपून नियमित कामकाज सोमवारपासून सुरू होत आहे. सरन्यायाधीश रामण्णा यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठाची कार्यसूची रविवारी जाहीर करण्यात आली. त्यात या याचिकांचा सुनावणीसाठी समावेश नसून या याचिका अन्य कोणत्याही खंडपीठाकडे वर्गही करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे त्यासंदर्भात सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रानी दिली आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या वकिलांनी सुनावणीची तारीख देण्याची विनंती केल्यास सरन्यायाधीश रामण्णा हे आपल्या पीठापुढे सुनावणी कधी घ्यायची, किंवा अन्य पीठाकडे याचिका वर्ग करायच्या, याचाही निर्णय घेणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com