मार्क्स वाढवण्यासाठी शिक्षकाची शरीरसुखाची मागणी; पालकांकडून शिक्षकाला चोप (पहा व्हिडीओ)
मार्क्स वाढवण्यासाठी शिक्षकाची शरीरसुखाची मागणी; पालकांकडून शिक्षकाला चोप (पहा व्हिडीओ)सागर आव्हाड

मार्क्स वाढवण्यासाठी शिक्षकाची शरीरसुखाची मागणी; पालकांकडून शिक्षकाला चोप (पहा व्हिडीओ)

पुण्यातील मध्यवस्तीत असलेल्या एका नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकाने बारावीत शिकत असणाऱ्या विद्यार्थिनीला मार्क वाढवून देतो म्हणून शरीर सुखाची मागणी केली

सागर आव्हाड

पुणे : पुण्यातील Pune मध्यवस्तीत असलेल्या एका नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकाने बारावीत शिकत असणाऱ्या विद्यार्थिनीला मार्क वाढवून देतो म्हणून शरीर सुखाची मागणी केली. पीडित मुलीला वेळोवेळी शरीर सुखाची मागणी केली जात होती प्राध्यापकाच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने सर्व प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला हा सर्व प्रकार ऐकून आईवडिलांनी महाविद्यालयात जाऊन प्राध्यापकाच्या अंगावर शाई फेकत विश्रामबाग पोलीस स्टेशन मध्ये आणलं. The teacher's demand for physical comfort to increase marksto increase marks

विद्येच्या माहेरघरात, विद्यार्थिनीला मार्क्स वाढवून देतो म्हणून शरीरसुखाची एका नामांकित कॉलेज मधील प्राध्यपकाने केलेली होती. याबद्दल पीडीत मुलीच्या वडिलांनी या सर्व प्रकाराबद्दल की, मुलीला पास करतो म्हणून अश्लील शब्द वापरले गेले. तसेच "तुला मी बाहेर अमेरिकेत पाठवतो तुला स्कॉलरशिप मिळवून देतो..." असे फसवे वादे देऊन तिला विश्वासात घेत होता. माझ्या गरज पूर्ण कर अशी मागणी त्या शिक्षकाने केलेली होती. अश्या प्रकारे तब्बल तीन दिवस मुलीचा छळ करण्यात येत होता. अशी माहिती मुलीच्या वडिलांनी दिली आहे.

मार्क्स वाढवण्यासाठी शिक्षकाची शरीरसुखाची मागणी; पालकांकडून शिक्षकाला चोप (पहा व्हिडीओ)
रिअल हिरो विजयला कोर्टाने ठोठावला १ लाखाचा दंड

याबद्दल मुलीच्या पालकांनी जाब विचारल्यावर प्राध्यापकाने साफ मनाई केली. परंतु पीडित मुलीने सर्व हुशारीने प्रत्येक गोष्टीची रेकॉर्डिंग करून ठेवली होती. त्यामुळे पुराव्यानिशी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान हा सर्व प्रकार गनिमी कावा संघटनेला माहिती होताच त्यांनी मदतीसाठी पुढे येऊन आरोपी प्राध्यापकाच्या तोंडावर शाई फेकली आहे. तरी अश्या अमिषेला इतर कोण बळी पडलेले असेल तर त्यांनी सुद्धा याप्रकारे त्रास सहन न करता पुढे यावर असे आवाहन करण्यात आले आहे.

त्यानंतर पीडित मुलीची तक्रार पोलिसांनी घेतली असून पुढील गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये सुरू आहे.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com