Angarki Sankashti: प्रथमच अंगारकी चतुर्थीला सिद्धिविनायकाचे मंदिर खुले; दर्शनसाठी भाविकांची गर्दी

लॉकडाऊननंतर प्रथमच अंगारकी संकष्टी चतुर्थीला सिद्धिविनायक मंदिर खुले करण्यात आले
Angarki Sankashti: प्रथमच अंगारकी चतुर्थीला सिद्धिविनायकाचे मंदिर खुले; दर्शनसाठी भाविकांची गर्दी
Angarki Sankashti: प्रथमच अंगारकी चतुर्थीला सिद्धिविनायकाचे मंदिर खुले; दर्शनसाठी भाविकांची गर्दीSaam Tv

मुंबई : लॉकडाऊननंतर प्रथमच अंगारकी चतुर्थीला सिद्धिविनायक मंदिर खुले करण्यात आले आहे. सिद्धिविनायकाच्या दर्शनाकरिता खूप दुरून भक्त येत असल्याचे बघायला मिळत आहे. लॉकडाऊनमुळे मागील २ वर्षांपासून सिद्धिविनायकाचे मंदिर बंद करण्यात आले होते. रात्री १ वाजेच्या सुमारास दर्शनला सुरुवात झाली होती. आज सकाळी ७ वाजेपर्यंंत मंदिरामध्ये भाविकांना दर्शनकरिता खुले राहणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

हे देखील पहा-

मागील २ वर्षांपासून देशावर कोरोनाचे सावट आहे. कोरोनामुळे राज्यात सर्वच मंदिरे बंद करण्यात आली होती. लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर राज्यात काही मंदिरे उघडण्यात आली होती. मात्र, अद्याप देखील सिद्धिविनायक मंदिर बंद करण्यात आले होते. यामुळे बाप्पाचे दर्शन घेता आले नाही. तब्बल २ वर्षानंतर सिद्धिविनायकाचे दर्शन घेत आहे. कोरोनाच्या काळात सर्वजण अस्वस्थ झाले होते. आता कोरोनाचे संकट लवकरात लवकर जावो आणि सर्वांना आरोग्यपूर्ण जीवन लाभो, अशी सिद्धिविनायक चरणी प्रार्थना केल्याचे भक्तानकडून सांगितले जात आहे.

Angarki Sankashti: प्रथमच अंगारकी चतुर्थीला सिद्धिविनायकाचे मंदिर खुले; दर्शनसाठी भाविकांची गर्दी
जावयाने सासूच्या डोक्यात फरशी घालून आणि चाकूने वार करत केली निर्घृण हत्या; कारण ऐकाल तर व्हाल थक्क

सिद्धिविनायक मंदिराच्या कार्यकारी अधिकारी नंदा राउत यांनी याविषयी बोलताना सांगितले आहे की कोरोनाच्या नियमांचे पालन करून मंदिर खुले करण्यात आली आहेत. भाविकांना ऑनलाइन क्यूआर कोडद्वारे मंदिरात प्रवेश दिला जन्फर आहे. अडीच हजार भाविकांना दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनाला सोमवारी रात्री १ वाजेच्या सुमारास सुरुवात झाली आहे. मंगळवारी भाविकांना दर्शनाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेता येणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com