विधान परिषदेच्या 6 आमदारांचा कार्यकाळ संपला; 2 भाईंची फोटोसेशनला अनुपस्थिती

रामदास कदम, भाई जगताप, वरुण काका जगताप, गिरीष व्यास, सतेज पाटील, अमरिष पटेल, गोपिकीशन बजोरीया, प्रशांत परिचारक या सहा आमदारांचा आज कार्यकाळ संपत आहे.
विधान परिषदेच्या 6 आमदारांचा कार्यकाळ संपला; 2 भाईंची फोटोसेशनला अनुपस्थिती
विधान परिषदेच्या 6 आमदारांचा कार्यकाळ संपला; 2 भाईंची फोटोसेशनला अनुपस्थितीSaam TV

सुशांत सावंत

मुंबई : विधान परिषदेतील सहा आमदार आज निवृत्त होत आहेत. त्यांचा कार्यकाळ संपत आहे. रामदास कदम, भाई जगताप, वरुण काका जगताप, गिरीष व्यास, सतेज पाटील, अमरिष पटेल, गोपिकीशन बजोरीया, प्रशांत परिचारक या सहा आमदारांचा आज कार्यकाळ संपत आहे. अमरिष पटेल, सतेज पाटील पुन्हा निवडणून आल्यामुळे त्यांचं पुनरागमन होत आहे. विधान परिषदेत आज त्यांचा निरोप संभारंभ पार पडला. त्यानंतर आमदारांना निरोप देताना विधिमंडळाच्या पायऱ्यांवर फोटोसेशन करण्यात आलं. परंतु या वेळी शिवसेनेचे (Shivsena) आमदार रामदास कदम (Ramdas Kadam) आणि काँग्रेसचे (Congress) निवृत्त होणारे आमदार भाई जगताप अनुपस्थित होते.

विधान परिषदेच्या 6 आमदारांचा कार्यकाळ संपला; 2 भाईंची फोटोसेशनला अनुपस्थिती
Aurangabad: विना मास्क फिराल तर तुमचं वाहन होणार 'ब्लॅक लिस्टेड'

विधान परिषदेच्या निवृत्त सदस्यांचे फोटो काढते वेळी दोन भाईंची अनुपस्थिती होती. विधान परिषदेच्या निवृत्त सदस्यांसाठी विधान परिषद उपसभापती आणि सभापती यांच्या बरोबर विधीमंडळाच्या कामकाजाची आठवण म्हणून फोटो काढला जातो. हा फोटो काढत वेळी रामदास कदम आणि भाई जगताप हे अनुपस्थित दिसले. अनिल परब यांच्या बरोबर फोटो काढला जाऊ नये म्हणून रामदास कदम हे अनुपस्थित राहिले. मात्र भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी अनुपस्थतीत राहून कोणा बरोबर नाराजी व्यक्त केली. या बद्दल चर्चा मात्र सुरु झाली आहे.

दरम्यान मागच्या काही दिवसाता राम कदम आणि अनिल पबर यांच्यातील वाद चव्हाट्यावर आलेला पाहायला मिळाला. राम कदम यांनी पत्रकार परिषद घेवून अनिल परबांवर गंभीर आरोप केले. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली होती. राम कदम यांच्या आरोपांवर बोलणे अनिल परब यांनी टाळले होते. त्यानंतर आज विधान परिषदेत राम कदम आणि अनिल परब आमने- सामने आले होते.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com