बाळासाहेब ठाकरेंनी लावलेले शिवाजी पार्कवरील 'ते' झाड कोसळले

दादर येथील शिवाजी पार्कमधील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरील झाड कोसळले आहे.
Shivaji Park Balasaheb Thackeray
Shivaji Park Balasaheb ThackeraySaam TV

रुपाली बडवे -

मुंबई : दादर येथील शिवाजी पार्कमधील (Shivaji Park) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरील झाड कोसळले आहे. कोसळलेले गुलमोहराचे झाड हे बाळासाहेबांनीच (Balasaheb Thackeray) लावले होते. झाड पडल्याने स्मृतीस्थळाच्या कुंपणाचे नुकसान झाले आहे. तर झाड कोसळल्यानंतर माजी महापौर किशोरी पेडणेकर स्मृतीस्थळावर पाहणी केली आहे.

बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्क यांचे नाते सर्वांना परिचित आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांच्या सभेनी शिवाजी पार्क भरुन जायचा. याच शिवाजी पार्कच्या मैदानावरती बाळासाहेबांनी आपल्या हातांनी एक गुलमोहराचे झाड लावलं होतं. तर बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांचे स्मृतीस्थळ याच झाडाच्या जवळ उभारण्यात आले होते.

पाहा व्हिडीओ -

रविवारी रात्री मुंबईत झालेल्या पावसामुळे शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरेंनी लावलेले गुलमोहराचे झाड कोसळल्याची माहिती येथे काम करणाऱ्या व्यक्तीने किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना दिली. त्यानंतर पेडणेकर यांनी शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळाला भेट देत घटनेची पाहणी केली. दरम्यान, कोसळून पडलेले गुलमोहराचे झाड शिवाजी पार्कवरतीच पुनर्रोपीत करण्यात येणार आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com