Vidhan Bhavan: विधान भवनात आता दोन शिफ्ट्समध्ये काम होणार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय...

Maharashtra Vidhan Bhavan: विधान भवनातील कर्मचाऱ्यांना आता दोन सत्रात विभागण्यात आले आहे.
Vidhan Bhavan: विधान भवनात आता दोन शिफ्ट्समध्ये काम होणार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  निर्णय...
Vidhan Bhavan 2 Shifts WorkSaam Tv

सुशांत सावंत, मुंबई

मुंबई: राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या आणि तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध लावले गेले आहेत. मुंबईत गेल्या दहा दिवसांचा कोरोना पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला असला तरही कोरोना रुग्णसंख्या (Covid Patients) हवी तशी कमी झालेली नाही. अनेक सरकारी अधिकारी आणि नेते मंडळींना कोरोनाची लागण झाली आहे. अशाचत आता विधान भवनातील (Vidhan Bhavan) कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. विधान भवनातील कर्मचाऱ्यांना आता दोन सत्रात विभागण्यात आले आहे. (Maharashtra Vidhan Bhavan Work in Two Shifts)

हे देखील पहा -

विधान भवनात आता दोन (सत्रांमध्ये) शिफ्टमध्ये काम होणार आहे. यात पहिली शिफ्ट सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत तर दुसरी शिफ्ट दुपारी १ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत असणार आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी पहिल्या लाटेच्या वेळेस असा निर्णय घेण्यात आला होता. मुंबईतील (Mumbai) कोरोना (Corona) रुग्णसंख्ये गेल्या दोन दिवसांत १० टक्क्यांनी घट झाली आहे. तर ८० टक्के बेड्स रिकामे आहेत. मात्र पालिका आयुक्तांनी कोरोना नियमांच पालन करण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com