पत्नीच्या नोकरी करण्याच्या अधिकारावर गदा आणल्यास...; न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

पत्नी जर पतीपासून लांब अंतरावर राहून नौकरी करत असेल तर....
Pune Family Court
Pune Family CourtSaam TV

पुणे: पत्नीच्या नोकरी करण्याच्या अधिकारावर गदा आणता येणार नाही असा महत्त्वपर्ण निर्णय पुणे कौटुंबिक न्यायाल्याने दिला आहे. पत्नी जर पतीपासून लांब अंतरावर राहून नौकरी करत असेल तर तिच्या नोकरी करण्याच्या अधिकारावर गदा आणता येणार नाही, असं केल्यास ते राज्य घटनेच्या कलम 19 चं उल्लंघन ठरेल असा महत्त्वपूर्ण निर्णय पुणे कौटुंबिक न्यायालयाने (Pune Family Court) दिला आहे. एका वैवाहिक दांपत्याने पुणे कौटुंबिक न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली होती, त्या याचिकेवर सुनावणी करताना पुणे कौटुंबिक न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. या याचिकेतील पती-पत्नी लग्ना पूर्वीपासून वेगवेगळ्या ठिकाणीं नोकरीस कार्यरत होते.

पती खासगी कंपनीत तर पत्नी शासकीय सेवेत नोकरीस कार्यरत होती. लग्नानंतर पत्नीने पती जिथे नोकरीला आहे त्या ठिकाणी आपली बदली करून घेतली होती. मात्र काही दिवसांनी तिचं कार्यालय बंद पडल्याने तीला आधीच्याच ठिकाणी नोकरी करण्यास जाव लागलं. त्यामूळे पत्नी नांदायला येत नाही म्हणुन पतीने न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेतील पत्नी ही उच्चशिक्षित असून तिने स्वत:च्या बुद्धिमत्तेवर नोकरी मिळवली आहे. त्यामुळे तिला कुठेही पुरुषाप्रमाणे नोकरी करण्याचा अधिकार आहे. तिच्या नोकरी करण्याच्या अधिकारावर गदा आणता येणार नाही, अन्यथा ते भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 चं उल्लंघन ठरेल असा महत्त्वपूर्ण निर्णय पुणे कौटुंबिक न्यायालयाने दिला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com