Pune: तरुणीने ओटीपी शेअर केला अन् पावणे दोन लाखांना बसला फटका

ऑनलाईन खरेदीवरून मोहात अडकलेल्या एका २३ वर्षाच्या तरुणीने या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याचा परिणाम तिला भोगावा लागला
Pune: तरुणीने ओटीपी शेअर केला अन् पावणे दोन लाखांना बसला फटका
Pune: तरुणीने ओटीपी शेअर केला अन् पावणे दोन लाखांना बसला फटकाSaam Tv

पुणे : सायबर पोलीस, बँका वारंवार आपला गोपनीय क्रमांक, OTP शेअर करु नका, असे सांगत असते. मात्र, ऑनलाईन खरेदीवरून मोहात अडकलेल्या एका २३ वर्षाच्या तरुणीने या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याचा परिणाम तिला भोगावा लागला आहे. सायबर चोरट्यांनी तिच्या बँक खात्यामधून तब्बल १ लाख ८१ हजार रुपये ट्रान्सफर करुन बँक खाते रिकामे केले.

याप्रकरणी एनआयबीएम या ठिकाणी राहणाऱ्या एका २३ वर्षाच्या तरुणीने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. तरुणीने ३ महिन्यांपूर्वी एका संकेतस्थळावर ऑनलाईन बूट खरेदी करण्याकरिता ऑर्डर करण्यात आली होती. मात्र, त्यांना ऑर्डरचा कन्फर्मेशन कोड आला नाही. यामुळे तरुणीने गुगल सर्च करुन, त्यांच्या मोबाईलद्वारे संकेतस्थळाच्या कस्टमर केअर नंबर मिळविला आहे.

हे देखील पहा-

दुर्दैवाने हा नंबर सायबर चोरट्यांनी गुगलवर टाकलेला फेक नंबर होता. यामुळे तिने त्या क्रमांकावर संपर्क साधला. संपर्क साधल्यावर त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्या त्यानि ओटीपी शेअर करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे ओटीपी शेअर करण्यात आला होता. त्याचा वापर करुन, सायबर चोरट्याने विविध व्यवहार करुन १ लाख ८१ हजार ६२ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

तरुणीने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार अर्ज दिला होता. चौकशीअंती सायबर पोलिसांनी तो अर्ज कोंढवा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यानुसार कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक समाधान मचाले या प्रकरणाचा पुढील अधिक तपास करत आहेत. अनेकदा आपण एखाद्या उत्पादनाची माहिती घेत असताना किंवा चौकशी करत असताना गुगल सर्च करुन, कस्टमर केअरचा नंबर मिळविण्याचा प्रयत्न करत असते.

Pune: तरुणीने ओटीपी शेअर केला अन् पावणे दोन लाखांना बसला फटका
"बिग बॉस" फेम सपना चौधरी विरोधात अटक वॉरंट जारी; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मात्र, अनेकदा सायबर चोरट्यांनी नामांकित कंपन्यांची बनावट संकेतस्थळ तयार करुन, त्यावर आपले कस्टमर केअर नंबर टाकले असतात. यावर संपर्क साधल्यावर हे चोरटे आपण कंपनीकडून असल्याचे दाखवून ग्राहकांचा विश्वास संपादन करुन, त्यांना आपल्या जाळ्यात खेचत राहतात. अनेक जण त्यांनी सांगितलेल्या विषयी शहानिशा न करता ते सांगत असतात.

त्याप्रमाणे ते पुढे कृती करत असतात. त्यामधून ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असते. यामुळे गुगलवर सर्च करताना काळजी घ्यावी तसेच नागरिकांनी शहानिशा करुन, ऑनलाईन व्यवहार करावेत. आपला गोपनीय क्रमांक आणि ओटीपी कोणाला देखील शेअर करु नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com