बदलापुरात मोबाईल घेण्याच्या बहाण्याने चोरी; मोबाईल घेऊन चोरटा पसार

घटना सीसीटीव्हीत झाली कैद
बदलापुरात मोबाईल घेण्याच्या बहाण्याने चोरी; मोबाईल घेऊन चोरटा पसार
बदलापुरात मोबाईल घेण्याच्या बहाण्याने चोरी;मोबाईल घेऊन चोरटा पसारअजय दुधाणे

बदलापुर - दुकानात मोबाईल Mobile विकत घेण्याच्या बहाण्याने चोरटा Theft मोबाईल घेऊन पसार झाल्याची घटना घडली आहे. बदलापूर Badlapur पश्चिमेला घडलेली ही घटना सीसीटीव्हीत CCTV कैद झाली आहे. बदलापूर पश्चिमेला नीरज मिश्रा यांचे श्री गणेश इलेक्ट्रॉनिक्स नावाचे दुकान आहे. या दुकानात 1 सप्टेंबर रोजी एक चोरटा मोबाईल विकत घेण्यासाठी आला. त्याचा साथीदार दुकानाच्या बाहेरच गाडी चालू करून थांबला होता.

हे देखील पहा -

यावेळी या चोरट्याने मोबाईल बघता बघता विवो कंपनीचे दोन मोबाईल घेऊन धूम ठोकली. यानंतर साथीदारासह तो बदलापूर स्टेशनच्या दिशेने पळून गेला. हा चोरटा पळून जात असताना दुकानातल्या मुलाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र हा चोरटे पळून गेले. ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील कारवाई सुरु आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com