...तर फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील; राऊतांची टीका

शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे.
...तर फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील; राऊतांची टीका
Sanjay RautSaam TV

मुंबई - राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव झाल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजय झाला. त्यानंतर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे.

यावेळी संजय राऊत म्हणाले की, अपक्ष आमदारांबाबत काही बोलायचं नाही. आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याच्यामध्ये कोणत्याही आमदाराचा अवमान करण्याचा प्रश्न नाही आम्ही काय बोलतोय हे त्यांनाही माहित आहे आणि भाजपला ही माहित आहे. आमच्या हातात जर ४८ तासांसाठी ईडी दिली तर देवेंद्र फडणवीस देखील शिवसेनेला मत देतील असा हल्लाबोल राऊत यांनी केला आहे.

तसेच केंद्रीय गृहखात्याकडून निवडणूक आयोगाला कसे फोन जात होता. कुणाची मते बाद करायचं यावर कशी चर्चा सुरु होती यंत्रणा आमच्याकडेही आहेत फक्त ईडी नाही असा देखील संजय राऊत यावेळी म्हणाले.

पुढे संजय राऊत म्हणाले की, अपक्ष आमदारांनी कुणाला पाठिंबा दिला हे आम्हाला माहीत आहे. एक विजय झाला, एक पराभव झाला म्हणजे अणूबॉम्ब कोसळला असं होत नाही किंवा महाप्रलय आला आणि सर्व वाहून गेलं असं होत नाही. अनेक राज्यात असा निकाल लागला आहे. राजस्थानामध्ये काँग्रेस जिंकली. हरियाणात रडीचा डाव करून अजय माकन यांचा पराभव केला.

Sanjay Raut
गृहिणींचे बजेट कोलमडणार; पावसाळ्याच्या तोंडावर भाज्यांच्या किंमतीत वाढ

महाराष्ट्रात सुद्धा आयोगाला हाताशी धरून इथले नेते काय करत होते सर्व माहीत आहे. केंद्रीय गृहखात्याकडून निवडणूक आयोगाला कसे फोन जात होते कुणाचं मत बाद करायचं यावर कशी चर्चा सुरू होती हे सर्व माहीत आहे. यंत्रणा आमच्याकडेही आहेत. फक्त ईडी नाही. फक्त ईडी आमच्याकडे 48 तासासाठी दिली तर भाजपही आम्हाला मतदान करेल, असं ते म्हणाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com