“तिन्ही पक्षात कोणीही ज्योतिरादित्य शिंदे नाही”; राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला (Video)

महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याचा निमित्त ‘साम’ टीव्हीने संजय राऊत यांची खास मुलाखत घेतली आहे.
“तिन्ही पक्षात कोणीही ज्योतिरादित्य शिंदे नाही”; राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला (Video)
“तिन्ही पक्षात कोणीही ज्योतिरादित्य शिंदे नाही”; राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला (Video)Saam Tv

मुंबई: महाविकास आघाडी सरकारने Mahavikas Aghadi Government दोन वर्ष पूर्ण केले आहे. विरोधकांनी कितीही भ्रम निर्माण केला तरीही सरकार उत्तम चालले आहे आणि हे सरकार प्रदीर्घ काळासाठी बनले आहे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी विरोधकांना केलं आहे. महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याचा निमित्त ‘साम’ टीव्हीने संजय राऊत यांची खास मुलाखत घेतली आहे.

व्हिडीओ-

महाविकास आघाडी सरकार पुढच्या २ महिन्यात, ३ महिन्यात, ६ महिन्यात पडणार अश्या टीका नेहमी विरोधी पक्षाकडून होत असतात, याविषयी बोलतं असताना राऊत म्हणाले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrakant Patil नेहमी महाविकास आघाडी सरकार पडण्याचे भाकीत करत असतात. त्यावर राऊतांनी चोख प्रतिक्रिया दिली, चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल केला, “चंद्रकांत पाटील यांनी सरकारला गुढीपाडव्यापर्यंत मुदत दिली आहे. लहानपणी आम्ही ऐकायचो ‘गुढी पाडवा, नीट बोल गाढवा’, असे हे बोलत आहेत. त्यांनी असे करू नये. तुम्ही सरकार पाडायची वेळ आता निघून गेली आहे, तुम्हाला वाटले सरकार पंधरा दिवसात पडेल, दहा दिवसात पडेल, असे करून सरकार पाडता येत नाही. हे त्यांना समजले पाहिजे, असं राऊत यावेळी म्हणाले.

तर, पुढे ते म्हणाले, केंद्रीय बळाचा, सत्तेचा वापर करून सरकार पाडण्याची वेळ निघून गेली. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये खूप फरक आहे. आमच्याकडे तिन्ही पक्षात कोणीही ज्योतिरादित्य शिंदे नाही, त्यामुळे सरकार टिकणार”, असा टोला लगावत, राऊतांनी महाविकास आघाडी सरकार हे दिर्घ काळ पर्यंत चालणारे सरकार आहे, असा स्पष्ट इशारा दिला.

“तिन्ही पक्षात कोणीही ज्योतिरादित्य शिंदे नाही”; राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला (Video)
अडीच अडीच वर्ष ही अफवा- संजय राऊत...(पहा व्हिडिओ)

खेला होबे आधी महाराष्ट्रात;

तृणमूलच्या ममतांचे उदाहरण देत संजय राउत म्हणाले की, “मधल्या काळात सगळे विरोधीपक्ष दिल्लीमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली जमले होते. तेव्हा या बैठकीत तृणमूल काँग्रेसचे नेते बोलत होते. त्यांनी कसे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवत मोठा विजय मिळवला. तेव्हा मी उठून उभा राहिलो. त्यांना सांगितल तुमच्या आधी खेला होबे महाराष्ट्रात आम्ही करून दाखवले आहे.

ते पुढे म्हणाले की, तीन भिन्न विचारांच्या पक्षांनी एकत्र येवून भाजपाला राज्यातून दूर ठेवले आहे. थेट निवडून आल्यानंतर सत्ता स्थापन करणे सोप्प असतं. मात्र भूमिका वेगळ्या असलेल्या पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करायच आणि बलाढ्य, केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षाला दूर ठेवायचे हे खऱ्या अर्थाने खेला होबे झाले.” असे यावेळी संजय राऊत म्हणाले आहेत.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com