राज्य शासनाने 'ताे' निर्णय बदलला तरी मला वाईट वाटण्याचे कारण नाही - शरद पवार

शरद पवार यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? निर्णय बदलाचे संकेत
Sharad Pawar
Sharad PawarSaam TV

बारामती - राज्य सरकारने सुपर मार्केट (Super Market) मध्ये वाईन विक्रीला दिलेली परवानगी आणि त्याला होत असलेला विरोध हा काही फार चिंतेचा विषय नाही. जर अनेक स्तरातून विरोध होत असेल आणि राज्य सरकारने या संदर्भात निर्णय बदलला तरी त्याचे मला वाईट वाटण्याचे कारण नाही अशी प्रतिक्रिया शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज बारामतीत व्यक्त केली. (Sharad Pawar Latest News)

हे देखील पहा -

गोविंदबाग या निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. राज्य सरकारच्या सुपर मार्केट मधील वाईन उपलब्ध करून देण्याच्या निर्णयावर भाजपसह काही संघटनांनी विरोध केला आहे. या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, वाईन हा काही चिंतेचा विषय नाही. जर अनेक स्तरातून विरोध होत असेल आणि सरकारने हा निर्णय मागे घेतला तरी त्याचे वाईट वाटण्याचे कारण नाही.

Sharad Pawar
Pune University Exam: पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइनच होणार

पुढे शरद पवार म्हणले की, कारण देशभरातील सर्वच राज्यांमध्ये दुकानांमध्ये देशी आणि विदेशी दारू मिळते. त्यामध्ये वाईनचा खप अत्यंत तुलनेने कमी आहे. देशातील सर्वाधिक द्राक्ष उत्पादन हे नाशिक जिल्ह्यात होते. या जिल्ह्यामध्ये अठरा वाईनरी आहेत. 18 वायनरी उत्पादन घेतात. ही वाईन केवळ मोठ्या मॉल्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासंदर्भात सरकारने मंजुरी दिली आहे. वायनरींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळते. मात्र त्याला विरोध होत असेल तर सरकारने या संदर्भात तो निर्णय मागे घेतला तरी त्याचे काही वाईट वाटायचे कारण नाही असे देखील ते यावेळी म्हणाले.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com