महागडे कपडे चोरून महिलांनी ठोकली धूम; घटना दुकानातील 'CCTV'त कैद

महिला चोरांनी दुकानात घुसून महागडे कपडे चोरुन पळ काढल्याने एकच खळबळ उडाली आहे.
महागडे कपडे चोरून महिलांनी ठोकली धूम; घटना दुकानातील 'CCTV'त कैद
Clothes Robbery in kalyansaam tv

कल्याण : वाढत्या महागाईच्या झळा तीव्र झाल्या असून मुलभूत गरजा भागवण्यासाठी चोरट्यांनी दुकानांमध्ये डल्ला मारल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत . अशीच एक चोरीची घटना कल्याण पश्चिमेकडील केशाज लेडीज गारमेंट (Ladies Garments Robbery) दुकानात घडली. महिला चोरांनी दुकानात घुसून महागडे कपडे चोरुन पळ काढल्याने एकच खळबळ उडाली आहे. चोरट्यांची टोळी दुकानातील सीसीटीव्हीत कैद (cctv footage) झाली असून बाजारपेठ पोलिसांनी (Bajarpeth police) चोरांचा शोध सुरु केलाय. चोरीच्या घटनेची तक्रारीची नोंद बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आलीय. चोरट्यांमध्ये ५ महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.

Clothes Robbery in kalyan
'MPSC' पूर्व परीक्षेच्या तारखेची घोषणा; एवढ्या पदांसाठी होणार भरती

याबाबत सविस्तर वृत्त असं की,कल्याणच्या केशाज या कपड्यांच्या दुकानातू तब्बल ३२ हजाराचे कपडे चोरून चोरट्यांनी पलायन केले आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.त्याच दरम्यान ७ जणांच्या टोळक्याने दुकानातील सेल्समनला कपडे दाखविण्यास सांगितले.

सीसीटीव्ही फुटेजनुसार, एक महिला कॅमरा समोर ड्रेस पाहण्याचा बहाणा करते आणि या ड्रेसच्या मागे दुसरी महिला साडीच्या आत ड्रेस भरून घेताना दिसत आहे. त्यानंतर त्या महिलेने काही क्षणातच पाच ड्रेस साडीच्या आत लपवले आणि काहीच घडले नाही, अशा अविर्भावात वावरताना सीसीटीव्हीत दिसते. यो टोळीमध्ये एक महिला सराईत चोर असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.E

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.