बदलापुरात चोरट्यांनी मोबाईल शॉप फोडलं; दीड लाखांचा मुद्देमाल लंपास...

शिरगाव आपटेवाडी भागात ही चोरी झाली आहे. मोबाईल, लॅपटॉप, स्मार्टवॉच, हेडफोन असा दीड लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. चोरटे सीसीटीव्हीतही कैद झाले आहेत.
बदलापुरात चोरट्यांनी मोबाईल शॉप फोडलं; दीड लाखांचा मुद्देमाल लंपास...
बदलापुरात चोरट्यांनी मोबाईल शॉप फोडलं; दीड लाखांचा मुद्देमाल लंपास...अजय दुधाणे

बदलापूर: बदलापुरात चोरट्यांनी मोबाईलचं दुकान फोडून तब्बल दीड लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. बदलापूर पूर्वेच्या शिरगाव आपटेवाडी परिसरात बुधवारी पहाटेच्या सुमारास ही चोरीची घटना घडली. (Thieves break into mobile shop in Badlapur; Property worth Rs 1.5 lakh stolen)

हे देखील पहा -

शिरगाव आपटेवाडी नाक्यावर तुषार पवार यांच्या मालकीचं आर. टी. इन्फोटेक नावाचं मोबाईलचं दुकान आहे. या दुकानात बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास दोन अज्ञात चोरटे शटर वाकवून आत घुसले. यानंतर त्यांनी बॅटरीच्या साहाय्याने मोबाईलच्या दुकानात शोधाशोध केली. दुकानाच्या काउंटरमध्ये ठेवलेला एक लॅपटॉप, काही मोबाईल फोन्स, स्मार्टवॉच, हेडफोन्स असा तब्बल दीड लाखांचा मुद्देमाल घेऊन हे चोरटे पसार झाले. विशेष म्हणजे शोकेसमधल्या नवीन मोबाईलला मात्र या चोरट्यांनी हात लावला नाही. तर दुकानात रिपेरिंगसाठी आलेले आणि रिचार्ज करण्यासाठी ठेवलेले फोन या चोरट्यांनी चोरून नेले.

बदलापुरात चोरट्यांनी मोबाईल शॉप फोडलं; दीड लाखांचा मुद्देमाल लंपास...
त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र भिमाशंकरला श्रृंगार...!

चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या घटनेमुळे बदलापूर शहरात पुन्हा एकदा रात्रीच्या वेळी दुकानं फोडणारी चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय. या चोरीप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात भादंवि 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतायत.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com