दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी पादचाऱ्याचा  मोबाईल हिसकावला; घटना सीसीटीव्हीत कैद
दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी पादचाऱ्याचा मोबाईल हिसकावला; घटना सीसीटीव्हीत कैदअजय दुधाणे

दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी पादचाऱ्याचा मोबाईल हिसकावला; घटना सीसीटीव्हीत कैद

दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी कामावर निघालेल्या एका पादचाऱ्याच्या खिशातून मोबाईल हिसकावून पळ काढल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये घडला आहे.

उल्हासनगर: दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी कामावर निघालेल्या एका पादचाऱ्याच्या खिशातून मोबाईल हिसकावून पळ काढल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये घडला आहे. सकाळी सहा वाजता हा प्रकार घडला असून ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली आहे. (Thieves from the bike snatched the pedestrian's mobile; Incident captured on CCTV)

हे देखील पहा -

उल्हासनगरच्या कॅम्प ४ भागात लालचक्की परिसर आहे. या भागात मोठ्या प्रमाणात चाकरमानी वास्तव्याला असून रेल्वे स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर असल्यानं इथले प्रवासी सकाळी चालत रेल्वे स्टेशन गाठतात. अशाच पद्धतीने मंगळवारी पहाटे ६ च्या सुमारास एक पादचारी कामावर जायला निघाला होता. यावेळी लालचक्की भागातल्या कमानीजवळ बाईकवरून आलेल्या दोन चोरट्यांनी या या पादचारीच्या शर्टच्या खिशात ठेवलेला मोबाईल हिसकावत पळ काढला.

दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी पादचाऱ्याचा  मोबाईल हिसकावला; घटना सीसीटीव्हीत कैद
Daud Ibrahim च्या हस्तकाला अटक

ही संपूर्ण घटना तिथल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली असून पोलीस चोरट्यांचा शोध घेतायत.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com