बायको अन् मेव्हणीच्या साथीनं देवाच्या दारीच चोरी; बारामतीत पडल्या बेड्या

महाराष्ट्रातील जवळपास 20 ते 25 मंदिरामध्ये चोरी केल्याचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
बायको अन् मेव्हणीच्या साथीनं देवाच्या दारीच चोरी; बारामतीत पडल्या बेड्या
बायको अन् मेव्हणीच्या साथीनं देवाच्या दारीच चोरी; बारामतीत पडल्या बेड्या

पुणे: शिरसाई माता मंदिरातील (Shirsai Mandir) दागिणे चोरणाऱ्या पती पत्नी व मेव्हणीला पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने महाराष्ट्रातील जवळपास 20 ते 25 मंदिरामध्ये चोरी केल्याचे गुन्हे उघडकीस आले आहेत. शनिवारी मध्यरात्री बारामती (Baramati) तालुका पोलीस ठाणे हद्दीतील शिसुफळ गावी असलेल्या शिरसाई मंदिरातील देविच्या अंगावरील दागिणे व मंदिरातील इतर वस्तु चोरीस गेल्या होत्या. पोलिसांनी (Police) 14 तासाच्या आत आरोपीला अटक केली आहे.

बायको अन् मेव्हणीच्या साथीनं देवाच्या दारीच चोरी; बारामतीत पडल्या बेड्या
22 संघटना संप मागे घेण्यावर सकारात्मक; कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आवाहन

शाहरूख राजु पठाण, पुजा जयदेव मदनाळ तरी अनिता गोविंद गजाकोश अशी आरोपींची नाव आहेत. शिरसाई माता मंदिरात चोरी सह नागपूर, वर्धा, लातूर, बीड, उस्मानाबाद, सातारा, कोल्हापूर जिल्हयातील वेगवेगळया जवळपास 20 ते 25 मंदिरातील दागिणे व इतर साहित्य चोरल्याची कबुली दिली आहे. आरोपीकडून आता पर्यंत शिरसाई माता मंदिरात चोरीस सर्व दागिणे व पितळी वस्तू सह महाराष्ट्रातील इतर मंदिरातून चोरी केलेले दागिणे, वस्तू तसेच पिंपरी येथून चोरी केलेली इको वाहना सह जवळपास 12 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com