
पांडुरंग सरोदे
पुणे: मार्केट यार्ड परिसरातील चाफकर कॉलनी येथे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका सोसायटीमध्ये चोरट्यांनी घरफोडीचा प्रयत्न केला. नागरीकांनी माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरट्यांनी पोलिसांवर (Pune Police) हल्ला चढविला. पोलिसांनीही जोरदार प्रतिकार करीत त्यांच्यावर गोळीबार (Firing) केला. दरम्यान, अंधाराचा फायदा घेऊन चोरटे पळून गेले. (thieves to attack the police in pune, police also fire for counter attack)
हे देखील पहा -
सातारा रस्त्यावरील सिटी प्राईड चित्रपटगृहाच्या मागील बाजुस चाफळकर कॉलनी आहे. या कॉलनीतील एका पाच मजली सोसायटीमध्ये मंगळवारी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास चार ते पाच चोरटे शिरले. त्यांनी तिसऱ्या मजल्यावरील एका सदनिकांमध्ये चोरी (Theft) करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आवाज झाल्याने शेजारी राहणारे नागरीक उठले, त्यांनी घराबाहेर येण्याचा प्रयत्न केला. परंतु चोरट्यांनी अन्य सदनिकांच्या बाहेरुन कड्या लावल्याने नागरीकांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे सतर्क नागरीकांनी याबाबत तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला खबर दिली. पोलिस नियंत्रण कक्षातुन मार्केट यार्ड पोलिस ठाण्याच्या बीट मार्शल पोलिस कर्मचाऱ्यांना याबाबतची माहिती देण्यात आली. बीट मार्शल व रात्रगस्तीवरील पोलिस काही वेळातच पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
चोरट्यांना पोलिस आल्याचे कळताच त्यांनी पोलिस व सुरक्षारक्षकांवर दगडफेक करुन त्यांच्यावर शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनीही चोरट्यांचा प्रतिकार केला. अखेर पोलिसांनी चोरट्यांच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेऊन तेथून पलायन केले. चार ते पाच जणांच्या टोळक्याने चोरीचा प्रयत्न केला असून याबाबत मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे, या घटनेत चोरट्यांच्या हाती काहीही लागले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Edited By - Akshay Baisane
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.