मुंबईला यायचा विचार करताय? तर 'या' प्रवाशांना मिळणार RT-PCR चाचणीमधून सूट

गुजरात, गोवा, दिल्ली, राजस्थान आणि केरळ येथून येणाऱ्यांना हे आधी लागू होते.
मुंबईला यायचा विचार करताय? तर 'या' प्रवाशांना मिळणार RT-PCR चाचणीमधून सूट
मुंबईला यायचा विचार करताय? तर 'या' प्रवाशांना मिळणार RT-PCR चाचणीमधून सूट Saam Tv

कोविड -19 मधील नवीन रुग्णांमध्ये घट आणि लसीकरणाच्या वाढत्या व्याप्तीमुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या स्थानिक प्रवाशांना ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना RT-PCR चाचणी बंधकारक करणे बंद करावे अशी विनंती केली होती.

सरकारने सांगितले आहे की संपूर्ण लसीकरण (Corona Vaccine) झालेल्या स्थानिक प्रवाशांना हवाईमार्गे मुंबईत प्रवेश करण्यासाठी कोविड चाचणी अहवाल असण्याची गरज भासणार नाही.

मुंबईला यायचा विचार करताय? तर 'या' प्रवाशांना मिळणार RT-PCR चाचणीमधून सूट
शिवसेनेतील अंतर्गत नाराजी उघड; विदर्भात एकही मंत्री नसल्याने नेते नाराज

देशातूनच महानगरात येणाऱ्या प्रवाशाचे संपूर्ण लसीकरण झाले असल्यास RT-PCR अहवाल निगेटिव्ह बंधणकारक असणे बंद करावे अशी विनंती यापूर्वी बीएमसीने राज्य सरकारला केली होती, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की, बीएमसीचे प्रमुख इक्बालसिंग चहल यांनी राज्य सरकारला या विनंतीसंदर्भात एक पत्र लिहिले होते. गुजरात, गोवा, दिल्ली, राजस्थान आणि केरळ येथून येणाऱ्यांना हे आधी लागू होते. त्या काळात या राज्यात जास्त प्रमाणात संसर्ग होता. परंतु, त्यानंतर या राज्यातून येणाऱ्या सर्वच प्रवाशांवर बंधनं घालण्यासाठी निर्बंध अधिक वाढवण्यात आले होते असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

चहल यांनी आपल्या पत्राद्वारे म्हटले होते की बरेच लोक व्यवसायाच्या उद्देशाने दिल्ली आणि इतर भागात प्रवास करीत असतात आणि त्याच दिवशी परत येत होते आणि अशा परिस्थितीत एकढ्या कमी अवधीत RT-PCR चाचणी अहवाल मिळणे अशक्य होते. कोविड -19 लसीकरण अभियान देशभरात सुरू असून संपूर्ण लसीकरण झालेल्या अनेक नागरिकांना RT-PCR चाचणी निगेटिव्ह अहवालाचा नियम माफ करावा अशी विनंती करण्यात आली आहे.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com