माणुसकी याला म्हणतात! महिला पोलीसामुळे भटक्या गर्भवती गाढविणीला मिळाला आसरा

डोंबिवली मधील महिला पोलीस नाईक पदावर असलेल्या स्वाती नाईक यांच्यामुळे एका भटक्या गर्भवती गाढविणीला मायेचा आसरा मिळाला आहे.
माणुसकी याला म्हणतात! महिला पोलीसामुळे भटक्या गर्भवती गाढविणीला मिळाला आसरा
माणुसकी याला म्हणतात! महिला पोलीसामुळे भटक्या गर्भवती गाढविणीला मिळाला आसराप्रदीप भणगे

डोंबिवली : डोंबिवली मधील महिला पोलिस, जागरूक नागरिक आणि प्राणी मित्रांमुळे एका भटक्या गर्भवती गाढविणीला मायेचा आसरा मिळाला आहे. डोंबिवली पूर्वेतील रामनगर परिसरात एक गाढव गेले काही दिवस फिरत होते. रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस नाईक स्वाती मुळ्ये यांची नजर त्या भटकणाऱ्या गाढवावर गेली.

हे देखील पहा -

माणुसकी याला म्हणतात! महिला पोलीसामुळे भटक्या गर्भवती गाढविणीला मिळाला आसरा
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांना होऊ शकते अटक?

एका पाडलेल्या इमारतीच्या बांधकामाजवळ ते दिसत असल्याने सुरवातीला त्यांना तिथे ते ओझी वाहण्यासाठी आणले का ? याविषयी त्यांच्या मनात शंका आली. मात्र ते गाढव नसून गाढविण आहे आणि ती गाढविण गर्भवती असल्याचे प्रथम पाहणीत पोलीस नाईक स्वाती मुळ्ये यांना दिसून आले. त्यात त्या गाढविणीच्या पाठीला एक जखम देखील झाल्याचे त्यांना दिसून आले. स्वाती यांनी लगेच समाज माध्यमावरील एका प्राणीमित्र ग्रुपवर याची संबंधित पोस्ट टाकली. या पोस्टला डोंबिवलीतील जागरूक नागरिकांनी लगेच प्रतिसाद दिला. दर्शक शहा, अक्षय दुसाणे या तरुणांनी त्याचा शोध घेत त्याला कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या आवारात आणले आणि प्राणीमित्र संघटनेला फोन केला. तेव्हा पनवेल येथील hands that heal animal care foundation या संस्थेने या गाढवाचा सांभाळ करण्याची जबाबदारी घेतली. 

माणुसकी याला म्हणतात! महिला पोलीसामुळे भटक्या गर्भवती गाढविणीला मिळाला आसरा
Sakinaka Update: एक महिन्यात तपास पूर्ण करणार- पोलीस आयुक्त हेमंत नगराळे

याबाबत फाऊंडेशनच्या अनामिक चौधरी म्हणाल्या की, डोंबिवलीत 10 ते 12 गाढवे अशीच रस्त्यावर सोडून देण्यात आली आहेत, ही फार मोठी समस्या आहे. त्यांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी अनिमल केअर संस्था प्रयत्न करीत आहेत. तसेच त्यांच्या मालकाचा शोध लागणेही गरजेचे आहे. त्याने गरजेला या गाढवांचा उपयोग करून घेतला आणि नंतर असे सोडून दिले आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com