जवळचा प्रवासही लोकलविना परवडत नाही; सांगा लोकल सुरु करताय तरी कधी?

खासगी गाड्यांनी जाणे परवडेना' आणि बसमधून जायच तर वेळेत पोहचेना; अशी परिस्थिती झालेला प्रत्येक मुंबईकर सरकारला लोकल कधी सुरु करताय हाच प्रश्न विचारत आहे.
जवळचा प्रवासही लोकलविना परवडत नाही; सांगा लोकल सुरु करताय तरी कधी?
जवळचा प्रवासही लोकलविना परवडत नाही; सांगा लोकल सुरु करताय तरी कधी?Saam TV

मुंबई : कोरोना संसर्गाचा दर घटल्यानंतर मुंबईमधील निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यात आले आहेत. मात्र, मुंबईची लाइफलाइन असलेली 'लोकल-ट्रेन' सर्वसामान्यांसाठी अद्याप बंदच आहे.

'मुंबईची लोकल म्हणजे कमी वेळात आणि पैशात जास्त अंतर कापणारी आणि वेळ वाचवणारी लोकल' असं म्हणायला हरकत नसावी कारण लोकल बंद पण निर्बंध कमी असा शासन निर्णय आल्यापासून आत्तापर्यंत घरातच असणारा कामगार वर्ग आशेने कामावरती जायला लागला पण आपल्या लोकलच 'लो'बजेट त्याला खासगी गाड्यांनी जाणं परवडेना आणि बसेसमधून जायच म्हणलं तर वेळेत पोहचेना अशी परिस्थिती झालेला प्रत्येक मुंबईकर सरकारला लोकल कधी सुरु करताय हाच प्रश्न विचारत आहे.This is the question every Mumbaikar government is asking when it starts local.

हे देखील पाहा-

लोकल कधी सुरु होतील याकडे सर्वसामान्य मुंबईकर व आसपासच्या परिसरातील नोकरदार राज्य सरकारच्या निर्णयाकडं डोळे लावून बसले आहेत. कुर्ला ते गोवंडी रेल्वे ने प्रवासासाठी 5 रुपये लागतात बस ने प्रवासाठी बस स्टॉप वर गर्दी असते त्यामुळे वेळेत जातं येत नाही रिक्षाने प्रवास केला तर 150 रुपये लागतात. येवढे पैसे आणायचे कुठून त्यामुळे लवकरात लवकर लोकल ची तिकीट मिळावी अशी मागणी महिलांनी केली आहे. तर कुर्ला वरून सी एस टी एम टी ला लोकल ने जाण्यासाठी 15ते20 मिनिट लागतात,10रुपयात लोकने प्रवास करता येतोय मात्र बस ने प्रवास केला तर 25 द्यावे लागतात तसेच दीड दोन तास वेळ लागतो आणि टॅक्सी ने प्रवास केला तर दोनशे अडीजशे मोजावे लागतात. त्यामुळे कोरोनाचे निर्बंध कितीही शिथील झाले तरी मुंबईतील लोकल सेवा जोपर्यंत सुरू होत नाही, तोपर्यंत अर्थचक्र रुळावर येणार नाही.

जवळचा प्रवासही लोकलविना परवडत नाही; सांगा लोकल सुरु करताय तरी कधी?
पालघर जिल्हाही अनलॉक करा; आ.क्षितीज ठाकूरांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

असे अनुभव कथन मुंबईतील गृहिणीपासून नोकरदार करत आहेत त्यामुळे निदान दोन डोस पुर्ण केलेल्यांसाठी तरी हे मायबाप सरकार लोकल सुरु करतय की नाही याकडे सगळे लक्ष ठेवून आहेत.

Edited By-Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com