हे लसीकरण म्हणजे आमचं लक्षवेधी आंदोलन - आमदार राजू पाटील

लसीकरण म्हणजे एकप्रकारचे लक्षवेधी आंदोलनच असल्याची मनसेचे आमदार राजू पाटील (MLA Raju Patil) यांनी साम टीव्ही बोलताना सांगितले.
हे लसीकरण म्हणजे आमचं लक्षवेधी आंदोलन - आमदार राजू पाटील
आमदार राजू पाटीलप्रदिप भणगे

प्रदिप भणगे

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivali) महापालिकेस राज्य सरकारकडून (State Govenment) पुरेशी कोरोना प्रतिबंधक लस (Corona Vaccine) उपलब्ध होत नसल्याने महापालिकेस लसीकरण अनेकदा स्थगित ठेवावे लागते. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय पाहता, मनसेने शनिवारपासून तीन दिवस मोफत लसीकरण सुरू केले आहे. हे लसीकरण म्हणजे एकप्रकारचे लक्षवेधी आंदोलनच असल्याची मनसेचे आमदार राजू पाटील (MLA Raju Patil) यांनी साम टीव्ही बोलताना सांगितले.

कल्याण-शीळ रोडवरील प्रिमिअर ग्राऊंडवर भरवलेल्या या मोफत लसीकरण मोहिमेचा काल प्रारंभ रिक्षा संघटनेचे अध्यक्ष काळू कोमास्कर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पाटील यांनी वरील वक्तव्य केले. ते म्हणाले, यापूर्वी कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महिनाभर स्वखर्चातून वॉर्डन नियुक्त केले होते. त्याचप्रमाणे आता सरकारकडून लस मिळत नसल्याने मनसेने स्वखर्चातून लसीकरण सुरू केले आहे. केडीएमसीला कोरोना इनोव्हेशन अवॉर्ड मिळाला.

आमदार राजू पाटील
बैलाच्या हत्येप्रकरणी वाई तालुक्यातील युवक ताब्यात; चाैकशी सुरु

महापालिका पुरस्काराची धनी झाली असली, तर लस मिळत नसल्याने नागरिकांच्या मनात महापालिके विषयी तिरस्काराची भावना आहे. पाच लाखात आम्ही पण डॉक्टरकी मिळू शकतो याला अर्थ नसतो. तुम्ही टॅक्स देता आहेत तर लोकांना सेवा द्या. आजचे लसीकरण म्हणजे आमचं लक्षवेधी आंदोलन आहे. आम्ही लस विकत घेऊन मोफत देत आहोत,आतातरी प्रशासन आणि सत्ताधारी यांनी डोळे उघडावेत.

नवी मुंबई महापालिकेने जसे लसीचे डोस विकत घेतले तसे केडीएमसी कडे का घेत नाही..पालिका ब्रेक द चेन बोलते मात्र लसीकरणाची चेन महापालिकाच मोडत आहे. महापालिकेने विकत लस घेऊन आता नागरिकांना मोफत लस दिली पाहिजे असे मनसे आमदार पाटील यांनी सांगितले.

मनसे तर्फे कल्याण-डोंबिवलीकरांसाठी जीवनदायिनी रुग्णवाहिका

कोरोनाच्या काळात रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने नागरिकांनाचे हाल झाले. हीच बाब घेऊन मनसे आमदार राजू पाटील यांनी जीवनदायिनी (कार्डिअॅक) रुग्णवाहिका कल्याण-डोंबिवलीकरांसाठी दिली..

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com