"ते चॅट्स खोटे" क्रांती रेडकर नवाब मलिकांविरोधात सायबर सेलकडे दाखल करणार तक्रार

नवाब मलिकांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन क्रांती रेडकर यांच्या तथाकथित चॅट्सचे स्क्रीनशॉट शेयर केले हाते.
"ते चॅट्स खोटे" क्रांती रेडकर नवाब मलिकांविरोधात सायबर सेलकडे दाखल करणार तक्रार
"ते चॅट्स खोटे" क्रांती रेडकर नवाब मलिकांविरोधात सायबर सेलकडे दाखल करणार तक्रारSaam Tv

मुंबई: एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede NCB) यांच्या दुसऱ्या पत्नी क्रांती रेडकर-वानखेडे (Kranti Redkar-Wankhede) या मुंबई सायबर क्राइम सेलकडे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik NCP) यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहेत. नवाब मलिकांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन क्रांती रेडकर यांच्या तथाकथित चॅट्सचे स्क्रीनशॉट शेयर केले हाते. हे चॅट्स खोटे असल्याचं सांगत आपण याविरोधात मुंबई सायबर क्राइम सेलकडे तक्रार दाखल करणार आहे अशी माहिती अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी दिली आहे. ("Those chats are false" Kranti Redkar will file a complaint against Nawab Malik to the Cyber ​​Cell)

हे देखील पहा -

आपल्या ट्विटमध्ये क्रांती रेडकर म्हणाल्या की, "या चॅट्स खोट्या तयार केल्या आहेत आणि पूर्णपणे खोट्या आहेत. माझे आजवर कोणाशीही असे संभाषण झालेले नाही. पुन्हा एकदा पडताळणी न करता केलेल्या पोस्ट. मुंबई सायबर क्राइम सेलकडे तक्रार दाखल करणार आहे. समर्थकांनो काळजी करू नका ही, आमची संस्कृती किंवा आमची भाषाही नाही." असं ट्विट त्यांनी केलं आहे.

"ते चॅट्स खोटे" क्रांती रेडकर नवाब मलिकांविरोधात सायबर सेलकडे दाखल करणार तक्रार
‘जय भीम’ची पुनरावृत्ती! आदिवासी महिलांना चोर समजून पोलिसांकडून बेदम मारहाण (पहा Video)

दरम्यान समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी देखील मलिकांविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने त्यांना दिलासा दिला नाही, पण नवाब मलिकांना माहितीची शहानिशा करुनच सार्वजनिक करु शकता असे आदेश दिले आहेत.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com