मुंबई कशी घडली ते परदेशातून येणाऱ्यांना कळलं पाहिजे - मुख्यमंत्री

'या प्रतिकृतीमधून राकटपणा दिसायला हवा होता आता तो दिसतोय. बाकी बोलायचं ते १४ तारखेला बोलेन.'
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySaam TV

रश्मी पुराणिक -

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मागे, किल्ले शिवनेरीची कायमस्वरुपी प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या किल्ले शिवनेरीच्या प्रतिकृतीचा उद्धघाटन सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते पार पडला यावेळी मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिन (Maharashtra Day) आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, ही किल्ले शिवनेरीची कायमस्वरुपी प्रतिकृती उभारण्याच स्वप्न आता साकारलं जातय, ते देखील महाराष्ट्र दिनी ही आनंदाची बाब आहे. महाराज हे आपलं वैभव आहेत, त्यांच्या वैभवाचं दर्शन घडायला हवं. हे स्मारक नाटकातील नव्हे तर खरं वाटायला हवं होतं. आपण जसं म्हणतो की राकट देशा त्याप्रमाणे या प्रतिकृतीमधून राकटपणा दिसायला हवा होता आता तो दिसतोय. बाकी बोलायचं ते १४ तारखेला बोलेन अरविंद मला वाटल आजा मला भगवी शाल द्याल पण गरज नाही, असं म्हणत मुख्यमंंत्र्यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना टोला देखील लगावला.

हे देखील पाहा -

मुंबई कशी घडली हे समजल पाहिजे म्हणून मुंबा देवीचं (Mumba Devi) दर्शन झालं पाहिजे. जे परदेशातून येतात त्यांना हे कळलं पाहिजे की मुंबई कशी घडली, म्हणून तीला वंदन करून (मुंबा देवीला) दर्शन करून मुंबईत येता येईल असंही मुख्यमंत्री म्हणाले.

देशाच्या आर्थिक राजधानीतील आंतरराष्ट्रीय विमानतळ (Shivaji Maharaj Mumbai International Airport) हा जगासाठी मुख्य प्रवेशद्वारच आहे. त्यामुळे जगाला महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची ओळख व्हावी म्हणुन विमानतळाच्या प्रवेश मार्गावर महाराष्ट्राचं अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) पुतळा बसवण्यात आला होता. आता याच पुतळ्याच्या मागे किल्ले शिवनेरीच्या प्रतिकृती कायमस्वरुपी उभारण्यात आलीय. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि परीसरास भव्य दिव्यतेचा साज चढला आहे. मुंबई विमानतळावर प्रवेश करताना आणि पश्चिम एक्सप्रेस वे वरून जाताना या भव्य दिव्य प्रतिकृतीचे दर्शन मुंबईकरांनाही करता येणार आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com