एसटी संपामुळे TET परीक्षेचे हजारो परीक्षार्थी परिक्षेला मुकणार
एसटी संपामुळे TET परीक्षेचे हजारो परीक्षार्थी परिक्षेला मुकणारSaamTvNews

एसटी संपामुळे TET परीक्षेचे हजारो परीक्षार्थी परिक्षेला मुकणार

येत्या 21 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयोजित शिक्षक पात्रता परिक्षेचे नियोजन करण्यात आले आहे.

पुणे : येत्या 21 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयोजित शिक्षक पात्रता परिक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यभरातील लाखो विद्यार्थी सदर परीक्षा देणार आहेत. परंतु, सध्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळचा संप तीव्र झाल्यामुळे अनेक परीक्षार्थी परीक्षा केंद्रांवर पोहचण्यासाठी मोठी गैरसोय होणार आहे. सदर परीक्षा वर्षानंतर होत असल्याने अनेक भावी शिक्षक परिक्षेसाठी अहोरात्र अभ्यास करत आहेत. मात्र एस. टी. संपाचा परीक्षा परिषदेने गांभीर्याने विचार करून रविवारी होणाऱ्या परिक्षेसंदर्भात योग्य निर्णय घेण्याची अपेक्षा परीक्षार्थी करत आहेत.

महाराष्ट्रातील अनेक डि.एड., बी. एड पात्रताधारक शिक्षक पात्रता परिक्षेच्या अटीमुळे नोकरीविना वंचित असून येणाऱ्या परिक्षेला पोहचण्यासाठी अपयश आल्यास खूप मोठे नुकसान होणार आहे. सदर परीक्षा वेगवेगळ्या कारणांसाठी तब्बल तीन वेळा पुढे धकलण्यात आली आहे. पण यंदाच्या परीक्षा वेळापत्रकाला प्रवासाची मोठी अडचण निर्माण झाली आहे. म्हणून परीक्षा परिषदेने तातडीने निर्णय घेऊन भावी शिक्षकांना दिलासा द्यावा, ही प्रमुख मागणी परीक्षार्थी करत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com