
मुंबई : मुंबई शहर दहशतवाद्यांच्या नेहमीच टार्गेटवर राहिलं आहे. भारताची आर्थिक राजधानी असल्याने अवघ्या जगाचं लक्ष मुंबईवर असतं. मात्र आज मुंबई पोलिसांना आलेल्या एका फोनने मोठी धावपळ झालेली पाहायला मिळाली. मुंबईच पून्हा एकदा दहशतवादी हल्ला होणार असल्याचा निनावी फोन मुंबई पोलिसांना आल्याने वातावरण काहीचं चिंताजनक बनल होतं. मात्र पोलिसांना सूत्र फिरवत फोन करणाऱ्या आरोपीला अटक केली.
मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्याचा इशारा मुंबई नियंत्रण कक्षाला फोन करुन देण्यात आला होता. आरोपीने फोनवर १९९३ साली मुंबईत घडवण्यात आलेल्या स्फोटाप्रमाणेच घातपाताचा इशारा दिला होता. तसेच या स्फोटानंतरही राज्यात दंगली घडतील, असंही म्हटले होते. (Mumbai Crime News)
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने तपास सुरू केला. या तपासात फोन करणाऱ्या आरोपीला दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी मालाडच्या पठाणवाडी परिसरातून फोन करणारा व्यक्ती आरोपी नबी खान उर्फ केजीएन लाला (वय ५५) याला अटक केली आहे.
या आरोपी विरोधात आझाद मैदान येथे गुन्हा दाखल करून त्याचा ताबा दहशतवाद विरोधी पथकाने आझाद मैदान पोलिसांना दिला आहे.या आरोपीवर जबरी चोरी, विनयभंग अतिक्रमण यासारखे १२ गुन्हे दाखल आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.