Bajaj Finance: 'खंडणी द्या, अन्यथा कंपनीचा सर्व डेटा हॅक करु'; बजाज फायनन्सला धमकी

उद्योग क्षेत्रात मोठं नाव असणाऱ्या बजाज फायनन्स (Bajaj Finance) कंपनीलाच सायबर क्राईमद्वारे फसविण्याचा प्रयत्न केरण्याची घटना समोर आली आहे.
Bajaj Finance: 'खंडणी द्या, अन्यथा कंपनीचा सर्व डेटा हॅक करु'; बजाज फायनन्सला धमकी
Bajaj Finance: 'खंडणी द्या, अन्यथा कंपनीचा सर्व डेटा हॅक करु'; बजाज फायनन्सला धमकीSaam TV

पुणे - सध्याच्या काळ हा ऑनलाईन तंत्रज्ञानाचा आहे या तंत्रज्ञानाचाचे जेवढे फायदे तेवढेच तोटे देखील आहेत. काहीजण आता या तंत्रज्ञानाचा वापर Cyber Crime साठी करत असून त्याद्वारे लोकांना फसविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं पाहिलं आहे. मात्र आता उद्योग क्षेत्रात मोठं नाव असणाऱ्या बजाज फायनन्स (Bajaj Finance) कंपनीलाच सायबर क्राईमद्वारे फसविण्याचा प्रयत्न केरण्याची घटना समोर आली आहे. Bajaj Finance या कंपनीच्या संजीव बजाज यांना E-Mail द्वारे तब्बल ११ कोटी ६३ लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. शिवाय खंडणी दिली नाही तर कंपनीचा सर्व डाटा हॅक करण्याची धमकी सुद्धा दिली आहे.

Bajaj Finance: 'खंडणी द्या, अन्यथा कंपनीचा सर्व डेटा हॅक करु'; बजाज फायनन्सला धमकी
New Covid Rules : राज्यात रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत नाईट कर्फ्यू! वाचा नवीन नियमावली

दरम्यान या सर्व प्रकाराबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात (Vimantal Police Station) ई-मेल पाठविणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी बजाज फायनन्स कंपनीतर्फे युवराज मोरे रा. हडपसर (Hadapsar) यांनी फिर्याद दिली आहे.

तर कंपनीचे वरिष्ठ अधिकारी संजीव बजाज, दीपक रेड्डी, दीपक बजारी आणि संजीव जैन यांच्या [email protected] या ई-मेल आयडीवरुन मेल पाठवण्यात आला असून यामध्ये डोजे कॉइन चलनाच्या माध्यमातून ११ कोटी ६३ लाख २९ हजार २१७ रुपये डोजे कॉइन पत्यावरती पाठवण्यास सांगितलं होते. सदर Mail हा २८ नोव्हेंबर २०२१ रोजी पाठवला होता. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक मंगेश जगताप करत आहेत.

हे देखील पहा -

क्रिप्टो करन्सीचा उपयोग

DOGE COIN ही क्रिप्टो करन्सी आहे. ती परदेशातील दोन कम्पूटर इंजिनिअर्सनी (Computer engineers) बनवली असून DOGE COIN च्या माध्यमातून ७३९५३७३ रक्कम मागण्यात आली आहे. या रकमेची भारतीय चलनात ११ कोटी ६३ लाख २९ हजार २१७ रुपये किंमत होते.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com