Mumbai News : गणपतीची वर्गणी मागायला गेले, थेट तुरुंगात पोहोचले; साकीनाका परिसरातून तिघांना अटक

Crime News : मुंबईतील साकीनाका जंक्शन, शालीमार हॉटेलजवळची ही घटना आहे.
Sakinaka Police
Sakinaka Police Saam TV

Mumbai News :

गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वच गणेशोत्सव मंडळांनी तयारी आपली तयारी सुरु केली आहे. तसेच अनेक गणेशोत्सव मंडळांनी वर्गणी गोळा करण्यासही सुरुवात केली आहे. मात्र मुंबईत जबरदस्तीने वर्गणी गोळा करणाऱ्या मंडळाच्या तीन जणांना अटक केली आहे.

मुंबईतील साकीनाका जंक्शन, शालीमार हॉटेलजवळची ही घटना आहे. एका मंडळातील काही कार्यकर्त्यंनी प्लास्टिक स्क्रॅपवाल्याकडून ५ हजार रुपयांच्या वर्गणीची जबरदस्ती केली. मात्र अशाप्रकारे जबरदस्तीने वर्गणी वसूल करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली आहे. (Latest Marathi News)

Sakinaka Police
Mumbai Dam Water Level : मुंबईची तहान भागवणाऱ्या तलावांतील पाणीसाठ्यात वाढ, सध्या 7 धरणांमध्ये किती जलसाठा?

मुंबई पोलिसांनी यापूर्वीच त्यांच्या सूचनांमध्ये कार्यकर्त्यांनी वर्गणी वर्गणीच्या स्वरूपातच मागावी, खंडणी मागू नये अन्यथा कारवाई केली जाईल असे म्हटले होते. मात्र काही मंडळाचे कार्यकर्ते ठराविक वर्गणीसाठी आग्रही असतात. असाच प्रकार साकीनाका येथील मेट्रो स्थानकाजवळ असलेल्या एका दुकानदारासोबत झाला. (Mumbai News)

Sakinaka Police
Mumbai Crime News : कर्जवसुलीसाठी फायनान्स कंपनीचा वारंवार फोन, संतापलेल्या कर्जदाराच्या कृत्याने अख्खी कंपनी हादरली

आरोपी प्रदीप पांडे, कृष्णा गुप्ता, अब्बास शेख या तिघांनी एका दुकानदाराकडे वर्गणी म्हणून ५ हजारांची मागणी केली. एवढे पैसे नसल्याचे दुकानदाराने सांगितल्यानंतरही आरोपी त्यांच्या मागणीवर ठाम होते. यातून त्यांच्यात वाद झाला. अखेर दुकानदाराने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी तिघांवर भादवी ३८५, ३४ नुसार गुन्हा दाखल करत या तिघांना अटक केली आहे. (Crime News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com