मंगलदास बांदल यांना अवैधरित्या कर्ज मंजूर केल्याप्रकरणी शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या तीन व्यवस्थापकांना अटक

वडगाव शेरी शाखेचे गोरख दोरगे, तर औंध शाखेचे प्रदीप निम्हण आणि कोथरुड शाखेचे नितीन बाठे या तीन व्यवस्थापकांना अटक
मंगलदास बांदल यांना अवैधरित्या कर्ज मंजूर केल्याप्रकरणी शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या तीन व्यवस्थापकांना अटक
मंगलदास बांदल यांना अवैधरित्या कर्ज मंजूर केल्याप्रकरणी शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या तीन व्यवस्थापकांना अटकSaamTv

रोहिदास गाडगे

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती तथा पुणे जिल्ह्याच्या राजकारणातील बडे नेते अशी ओळख असलेल्या मंगलदास बांदल यांना नियमबाह्य पद्धतीने कर्ज मंजूर केल्याप्रकरणी पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या तीन शाखांच्या व्यवस्थापकांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे. Three Bank managers arrested for illegally approving loan to Mangaldas Bandal

हे देखील पहा -

मंगलदास बांदल यांना या प्रकरणी यापुर्वीच शिक्रापूर पोलिसांनी अटक केली. वडगाव शेरी शाखेचे गोरख दोरगे, तर औंध शाखेचे प्रदीप निम्हण आणि कोथरुड शाखेचे नितीन बाठे या तीनही व्यवस्थापकांनी बांदल यांना नियमबाह्य पद्धतीने कर्ज मंजूर केल्याचे पोलीस तपासात दिसून आल्याने त्यांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे.

मंगलदास बांदल यांना अवैधरित्या कर्ज मंजूर केल्याप्रकरणी शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या तीन व्यवस्थापकांना अटक
सारे प्रवासी सोयीचे...कारण ठरलाय कोरोना!

तर दुसरीकडे शिवाजीराव भोसले बँकेचा परवाना हि रिझर्व्ह बँकेने ४०० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात रद्द केला आहे. मंगलदास बांदल यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या असून बँक गैरव्यवहार फसवणूक प्रकरणात शिक्रापूर पोलिस ठाण्यात चार गुन्हे दाखल असून या पुर्वी हि बांदल यांच्यावर शिक्रापूर पोलिस ठाण्यात इतर काही गुन्हे दाखल झाले आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com