Pimpri Chinchwad News : तिहेरी अपघातात तीन गंभीर जखमी; रावेत पोलिसांनी घेतले कार चालकाला ताब्यात

या अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Accident, Pimpri Chinchwad
Accident, Pimpri ChinchwadSaam Tv

पिंपरी चिंचवड शहरातील रावेत परिसरामधील मस्के वस्ती रोडवर आज सकाळी झालेल्या अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची (accident) चाैकशी करण्यासाठी पाेलिसांनी एका कार चालकास ताब्यात घेतले आहे.

या अपघाताबाबत अधिक माहिती अशी - भर धाव वेगाने चाललेल्या कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर धावणाऱ्या एका कारला तसेच रस्त्याच्या कडेला थांबलेल्या दुचाकी वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात रस्त्यावरून प्रवास करणारे दोन जण गंभीर जखमी (injured) झाले.

Accident, Pimpri Chinchwad
Kass Pathar : प्रतापगडानंतर कास पठारावर जिल्हाधिका-यांची धडाकेबाज कारवाई; दहा वर्षानंतर स्थानिकांत आनंद

या अपघातात कार चालक अमित खन्ना हा देखील गंभीर जखमी झाला आहे. त्याला रावेत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिवाजी गवारे (पोलीस निरीक्षक, रावेत पोलीस स्टेशन) म्हणाले या अपघातात महेश शिवारे आणि अरुण कुमार हे पादचारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रावेत परिसरातील एका खाजगी रुग्णालयात (hospital) उपचार करण्यात येत आहेत. या प्रकरणी एकास ताब्यात घेतले आहे. त्याची चाैकशी सुरु आहे.

Edited By : Siddharth Latkar

Accident, Pimpri Chinchwad
FIFA World Cup 2022 : काय सांगता ! ऑस्ट्रेलिया - डेन्मार्क सामन्यात मिरजेच्या पुढा-यांची चर्चा
Accident, Pimpri Chinchwad
Shivendraraje Bhosale : छत्रपतींच्या घराण्याचा वारसा सांगता ना ? असं का म्हणाले शिवेंद्रराजे उदयनराजेंना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com