Mahavikas Aghadi Morcha: मविआच्या मोर्चासाठी दोन ते अडीच हजार पोलिसांसह SRPFची चोख सुरक्षा; ड्रोनद्वारे ठेवली जाणार नजर

Mahavikas Aghadi Morcha: भाजपही मविआच्या मोर्चाविरोधात प्रतिमोर्चा काढणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रचंड पोलिस बंदोबस्तात हा मोर्चा पार पडणार आहे.
Maha vikas aghadi
Maha vikas aghadi Saam Tv

Mahavikas Aghadi Morcha: भाजपच्या नेत्यांकडून महापुरुषांबद्दल करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचा महामोर्चा उद्या, १७ डिसेंबरला मुंबईत काढण्यात येणार आहे. या महामोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली असली तरी राजकीय वातावरण पाहता महाविकास आघाडीच्या महामोर्चासाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. भाजपही मविआच्या मोर्चाविरोधात प्रतिमोर्चा काढणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रचंड पोलिस बंदोबस्तात हा मोर्चा पार पडणार आहे. (Mahavikas Aghadi March News)

Maha vikas aghadi
MVA Mahamorcha : 'मविआ'च्या महामोर्चाला परवानगी; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

असा असेल पोलिस बंदोबस्त

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) मोर्चाला २ ते अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. यात २ अतिरिक्त पोलिस आयुक्त ४ ते ५ पोलिस उपायुक्त यांच्याद्वारे हा बंदोबस्त हाताळण्यात येणार आहे. या मोर्चात (Morcha) कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही आणि कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही या अनुशंगाने स्थानिक परिसरात पोलिस आवाहन करणार आहेत. सोबतच या मोर्चात SRPFच्या वाढीव तुकड्यांचाही बंदोबस्त लावण्यात येणार. तसेच ड्रोनच्या माध्यमातून पोलिस मोर्चावर लक्ष ठेवणार आहेत.  (Latest Marathi News)

आदित्य ठाकरे पाहणी करणार

महाविकास आघाडीच्या मोर्चाची सुरूवात उद्या, १७ डिसेंबरला क्रूडास कंपनी येथून होणार आहे. या ठिकाणी आज दुपारी 3 वाजता शिवसेनेचे नेते पाहणीसाठी उपस्थित राहणार आहेत. यावेळी आदित्य ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत आणि पाहणी करणार आहेत. (Breaking Marathi News)

Maha vikas aghadi
महापुरुषांच्या अवमानाचा मुद्दा पेटला; मुंबईत उद्या 'मविआ'चा महामोर्चा विरुद्ध भाजपचं माफी मांगो आंदोलन

मविआ नेत्यांच्या सुरक्षेसाठी १५० सुरक्षा रक्षकांची टीम

उद्याच्या महाविकास आघाडीच्या मोर्चासाठी कडक पोलिस बंदोबस्त असला तरी महाविकास आघाडीकडून नेत्यांना संरक्षण देण्यासाठी 150 सूरक्षा रक्षकांची स्वतंत्र टीम तयार करण्यात आली आहे. यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी 50 सदस्य टीममध्ये सहभागी झाले आहेत. उद्या, १७ डिसेंबरला मोर्चापूर्वी महाविकास आघाडीतील सर्व सदस्य एकत्र एकाठिकाणी जमतील आणि त्यानंतर त्यांना महाविकास आघाडीतील सुरक्षा रक्षक सुरक्षा देतील.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com