गॅस सबसिडीचे पैसे कुठे गेले?; सुप्रिया सुळेंचा मोदी सरकारला सवाल

राज्यातील सर्व जिल्ह्यात महागाईची कविता वाचून आंदोलन करण्याचे आवाहन सुळे यांनी केले.
गॅस सबसिडीचे पैसे कुठे गेले?; सुप्रिया सुळेंचा 
मोदी सरकारला सवाल
Supriya Sule Latest News in Marathi, Supriya Sule in Pune, Pune Latest News, NCP latest newsSaam Tv

पुणे: आज पुण्यात राष्ट्रवादीकडून गॅसच्या महागाई विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यावेळी सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. गॅसची सबसिडी कुठे आहे? सबसिडीचे पैसे कुठे गेले? गॅसचे दर आज एक हजाराच्या पुढे गेले आहेत, केंद्र सरकार एवढे असंवेदनशील कसं आहे, असा सवालही खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी केला. (Supriya Sule Latest News in Marathi)

'लिंबु शरबत द्यायला माझी आई नको म्हणते कारण पुण्यात लिंबू १० रुपये, मुंबईत १५ रुपये लिंबू आहे. एवढी महागाई सध्या आहे. सुषमाजींचे शब्द ती कविता कानात आजही गुंजते आहे. मोदींना मी विचारते अनेकदा तुमचं सरकार असंवेदनशील कसं आहे?, असा सवालही खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला.

राज्यात काही चांगलं झालं तर केंद्रामुळे वाईट झालं तर राज्यामुळे असं सध्या सुरु आहे. महिला लाटणं घेवून रस्त्यावर उतरल्या तर दिल्लीत बसायला जागा मिळाणार नाही. राज्यातील सर्व जिल्ह्यात महागाईची कविता वाचून आंदोलन करण्याचे आवाहन सुळे यांनी केले.

Supriya Sule Latest News in Marathi, Supriya Sule in Pune, Pune Latest News, NCP latest news
किरीट सोमय्यांची 'युवक प्रतिष्ठाण' काळा पैसा पांढरा करणारी संस्था; संजय राऊतांचा आरोप

घरगुती गॅस (Gas) सिलेंडरचे दर १ हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत. याविरोधात पुण्यात आज राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आहे. पुण्यातील रस्त्यावर गॅसच्या टाक्या ठेवून राष्ट्रवादीने आंदोलन सुरु केलं आहे. यात आंदोलकांनी भाजप, तसेच केंद्र सरकार विरोधात घोषणा सुरु आहेत. महागाई विरोधाती आरतीचे पठण केले. मोदी सरकार विरोधात घोषणा देवून निषेध करण्यात आला. या आंदोलनात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासह राष्ट्रवादीचे (NCP) पदाधिकारी उपस्थित होत्या.

या आंदोलनात राष्ट्रवादीने महाआरती केली. मोठ्या संख्येने कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. या आंदोलनात अनेक महिलांनी घरातील गॅसच्या टाक्या आणल्या होत्या. इंधन दरवाढ विरोधात हनुमान चालीसा लावून हनुमानाला साकडे घालण्यात आले. सीएनजी, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ विरोधात आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादीच्या आंदोलनात वासुदेवही सहभागी झाले होते. महागाईविरोधात वासुदेवाचा जागर करण्यात आला. गॅस टाकीची हार घालून पुजा करत निषेध व्यक्त केला. ‘बहोत हुई महेंगाई की मार चले जाव मोदी सरकार’ ची घोषणाबाजी सुरु होती.

Edited By- Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.