
Mumbai News :
रस्त्यावरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन राजकीय पक्ष आक्रमक झालेले आहेत. त्यात आता मुंबईच्या वेशीवरील टोलनाक्यांवरील टोलवाढीच्या मुद्यावरुन राजकारण तापण्याची शक्यता आहे. कारण मुंबईत प्रवेश करण्याआधी लागणाऱ्या ५ टोलनाक्यावरील टोल वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
वाशी, मुलुंड एलबीएस, मुलुंड ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, दहिसर वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, ऐरोली या पाच टोल नाक्यांवरील शुल्क 1 ऑक्टोबरपासून वाढणार आहे. टोलमधील ही वाढ साधारणपणे दर तीन वर्षांनी होत असते. यापूर्वी टोल क्षुल्कात वाढ २०२० मध्ये वाढ झाली होती. (Latest News on Maharashtra)
टोलवाढ झाल्यानंतर हलक्या वाहनांसाठी ४० रुपये लागणार आहे. याआधी हा टोल 35 रुपये होता. ट्रक आणि मिनी बससाठी १०५ रुपयांवरून १३० रुपये तर जड वाहनांकडून १३५ रुपयांवरून १६० रुपये टोल आकारला जाणार आहे. हे दर २०२६ पर्यंत लागू असतील. (Mumbai News)
टोलवाढीच्या निर्णयानंतर मनसेने सरकारवर टीका केली आहे. मनसेने ट्वीट करत म्हटलं की, आधीच ठाणेकर ४ टोल भरतात, त्यात येत्या १ ऑक्टोबरपासून सरकार टोलवाढ करणार आहे.
हीच टोलधाड रोखण्यासाठी मनसे नेते अविनाश जाधव, सत्यवान दळवी, ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे, मनविसे सरचिटणीस संदीप पाचंगे निवेदन द्यायला गेले असता त्यांना पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतलं. बाप्पा बुद्धी दे रे ह्या निर्बुद्ध सरकारला, असं ट्वीट मनसेने केलं आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.