Pune Traffic News: पुणेकरांनो लक्ष द्या, दहीहंडीमुळे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; पर्यायी मार्ग कोणते?

Pune Traffic Updates: पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. दहीहंडी उत्सवानिमित्त पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत.
Traffic Updates  Dahi handi 2023 Pune traffic changes in today
Traffic Updates Dahi handi 2023 Pune traffic changes in today Saam TV

सचिन जाधव, साम टीव्ही

Pune Dahihandi 2023 Traffic News: पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. दहीहंडी उत्सवानिमित्त पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. शहराच्या मध्य भागातील शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता परिसरातील वाहतूक सायंकाळी ५ ते दहीहंडी संपेपर्यंत वाहतूक वळविण्यात येणार आहे.

वाहनचालकांनी या कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे. पुण्यात दरवर्षी दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. पुण्यातील दहीहंडी उत्सव सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून नागरिक येतात. (Latest Marathi News)

Traffic Updates  Dahi handi 2023 Pune traffic changes in today
Weather Updates: महाराष्ट्रात पावसाचं कमबॅक, अनेक जिल्ह्यांमध्ये बरसल्या सरी; आज कुठे कोसळणार पाऊस?

त्यामुळे दहीहंडीच्या दिवशी पुणेकरांना (Pune News) मोठा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, हीच बाब लक्षात घेता यंदा दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत काही बदल केले आहे. बुधवार चौकाकडून आप्पा बळवंत चौकाकडे एकेरी वाहतुक होणार आहे.

याशिवाय मजूर अड्डा चौक (बुधवार चौक) ते दत्तमंदिर चौक, बेलबाग चौक ते सेवासदन चौक, मजूर अड्डा चौक ते अप्पा बळवंत चौक, महात्मा फुले मंडई अशा रस्त्यांनी प्रवास करणाऱ्या नागरिकांना पर्यायी मार्ग वापरावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून (police) करण्यात आले आहे.

Traffic Updates  Dahi handi 2023 Pune traffic changes in today
Nanded Politics: नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

दुसरीकडे शहरातील पीएमपीएल बस मार्गात देखील मोठे बदल करण्यात आले आहेत. बसमार्ग क्र. ५० शनिवारवाडा ते सिंहगड या मार्गाच्या बस रस्ता बंद झाल्यानंतर स्वारगेट बस स्थानकावरून जाणार आहे. तर बस मार्ग क्र. ११३ अ. ब. चौक ते सांगवी या मार्गाच्या बस रस्ता बंद झाल्यानंतर मनपा भवन स्थानकावरून जाणार आहे.

याशिवाय बस मार्ग क्र. ८, ९, ५७, ९४, १०८, १४३, १४४, १४४ अ या मार्गाच्या बस रस्ता बंद झाल्यानंतर जाता-येता डेक्कन जिमखाना, मनपा भवन, गाडीतळ या मार्गाने जाणार असल्याची माहिती आहे. तर बस मार्ग क्र. १७४ ही बस रस्ता बंद झाल्यानंतर गाडीतळ मनपा, डेक्कन मार्गे धावणार आहे.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com