Accident : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रेलरचा भीषण अपघात; चालक गंभीर जखमी

Maval Accident News: ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि त्याने अज्ञात वाहनाला ठोकर दिली.
Accident On Mumbai Pune Highway
Accident On Mumbai Pune Highwayदिलीप कांबळे

मावळ: पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेच्या (Mumbai-Pune ExpressWay) मुंबई लेनवर पहाटे साडेपाच वाजता एका ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात (Accident) झाला आहे. ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि त्याने अज्ञात वाहनाला ठोकर देऊन रस्त्याच्या कडेला बॅरिकेट्स तोडून धडक दिली. त्यामुळे द्रुतगती मार्गावर ट्रेलर मध्येच थांबला. या अपघातात चालक जायरहुसेन गुलबुद्दीन छोटे, राहणार -मध्यप्रदेश हा चालक जबर जखमी होऊन गाडीमध्ये अडकून पडला होता.

Accident On Mumbai Pune Highway
Amravati: 'देव तारी त्याला कोण मारी' अख्खं घर उध्वस्त झालं, पण अलार्मने दिलं जीवनदान

या घटनेची खबर मिळताच बोरघाट वाहतूक पोलीस, आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, मृत्युंजय देवदूत, आणि लोकमान्य यंत्रणेची ॲम्बुलन्स तेथे दाखल झाली. जवळपास अर्धा तास प्रयत्न केल्यानंतर त्या जखमी चालकाला बाहेर काढण्यात यश आले. चालकाच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी त्याला पनवेलच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या अपघातामुळे काही काळ वाहतूककोंडी झाली होती, त्यानंतर विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com