ट्रेनला उशीर तर रेल्वे जबाबदार, प्रवाशांना द्यावी लागेल भरपाई: सुप्रीम कोर्ट

ट्रेनला ठराविक वेळेत आणि ठराविक ठिकाणी पोहोचण्यास उशीर जर झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी आता रेल्वेची असणार आहे.
ट्रेनला उशीर तर रेल्वे जबाबदार, प्रवाशांना द्यावी लागेल भरपाई: सुप्रीम कोर्ट
ट्रेनला उशीर तर रेल्वे जबाबदार, प्रवाशांना द्यावी लागेल भरपाई: सुप्रीम कोर्टSaam Tv

मुंबई - ट्रेनला Train उशीर झाल्यास रेल्वेच जबाबदार असणार आहे आणि प्रवाशांना त्याची भरपाई देखील द्यावी लागेल असा निर्णय सुप्रीम कोर्टाने Supreme Court घातला आहे. ट्रेनला ठराविक वेळेत आणि ठराविक ठिकाणी पोहोचण्यास उशीर जर झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी आता रेल्वेची असणार आहे. यासाठी रेल्वेला प्रवाशांना भरपाई द्यावी लागेल, असा निर्णय सुप्रीम दिला आहे.

हे देखील पहा -

सार्वजनिक वाहतुकीला खासगी क्षेत्राशी स्पर्धा करायची असेल, तर त्याला व्यवस्था आणि कार्यशैली सुधारणं आवश्यक आहे असे मत सुप्रीम कोर्टाने नोंदवले आहे. तसेच प्रवाशाला ३०,००० रुपये भरपाई देण्यास सांगण्यात आले आहे. ट्रेनला उशीर झाल्यास रेल्वे आपली जबाबदारी सोडू शकत नाही. रेल्वे प्रवाशांना विलंबाचे कारण कळवण्यात अपयशी ठरली तर प्रवाशांना भरपाई द्यावी लागेल, असा निकाल न्यायमूर्ती एम.आर. शाह आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठाने दिला आहे.

ट्रेनला उशीर तर रेल्वे जबाबदार, प्रवाशांना द्यावी लागेल भरपाई: सुप्रीम कोर्ट
जेंव्हा गणपती बाप्पा स्पेनमध्ये येशू ख्रिस्तांना भेटतात (पहा व्हिडिओ)

आपल्या देशातील जनता, प्रवाशी सरकारच्या दयेवर अवलंबून राहू शकत नाहीत. याची जबाबदारी कुणाला तरी घ्यायला हवी, असे मत देखील सुप्रीम कोर्टातील खंडपीठाने नोंदवले आहे. २०१६ मध्ये रेल्वेला उशीर झाल्याने नियोजित विमान प्रवास करता न आल्याने हजारो रुपयांचा फटका एका कुटुंबाला बसल्याचा प्रकार घडला होता. हे प्रकरण न्यायालयापर्यंत गेले होते. यात सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. ३० हजार रुपयांचा दंड ठोठावला.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com