मोठी बातमी! इमारतीच्या रहिवाशांसाठी मुंबईतच संक्रमण सदनिका

पहिल्या टप्प्यांतर्गत ४७ रहिवाशांना संक्रमण गाळ्यांमध्ये स्थलांतरित करण्याचे नियोजन
मोठी बातमी! इमारतीच्या रहिवाशांसाठी मुंबईतच संक्रमण सदनिका
मोठी बातमी! इमारतीच्या रहिवाशांसाठी मुंबईतच संक्रमण सदनिकाSaam Tv

मुंबई - शहर बेटावरील धोकादायक इमारतींतील Building रहिवाशांची मुंबई Mumbai उपनगरातील संक्रमण शिबीरात स्थलांतरित होण्याबाबतची उदासीनता लक्षात घेता, म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे यंदाच्या वर्षी जाहीर केलेल्या मुंबई शहर बेटावरील २१ अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींतील रहिवाशांकरिता दक्षिण मुंबईतच पर्यायी निवासाकरिता १७७ गाळे उपलब्ध होणार असून पहिल्या टप्प्यांतर्गत ४७ रहिवाशांना संक्रमण गाळ्यांमध्ये स्थलांतरित करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती, मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर Vinod Ghosalkar यांनी दिली.

दक्षिण मुंबईतील अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींतील रहिवाशांना निष्कासनाची सूचना मिळाल्यानंतर उपनगरातील संक्रमण शिबिरांत स्थलांतरित होण्यास नकार दर्शवितात. या परिस्थितीचा सकारात्मक विचार करता आणि कोणत्याही अपघातामुळे जीवित व वित्त हानी टाळता यावी याकरिता मंडळाने पुनरार्चित इमारतींतील गाळे धोकादायक इमारतींतील रहिवाशांकरिता उपलब्ध करवून देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली.

हे देखील पहा -

मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीत १४ हजार ७५५ उपकर प्राप्त इमारती जुन्या आणि जीर्ण अवस्थेत आहेत. पावसाळ्यापूर्वी दरवर्षी या इमारतींचे सर्वेक्षण करण्यात येते. २१ इमारती या वर्षी अतिधोकादायक जाहीर करण्यात आल्या आहेत.

मोठी बातमी! इमारतीच्या रहिवाशांसाठी मुंबईतच संक्रमण सदनिका
उल्हासनगरचे डम्पिंग मलंगगड येथे; ग्रामस्थांचा विरोध

या २१ इमारतींमध्ये ४६० निवासी आणि २५७ भाडेकरू राहत असतात. यापैकी २३६ निवासी रहिवाशांनी त्यांची इतरत्र पर्यायी व्यवस्था केली आहे. ४७ रहिवाशांना पहिल्या टप्प्यात संक्रमण गाळ्यांमध्ये स्थलांतरित करण्याचे नियोजन आहे. तर उर्वरित १७७ निवासी रहिवाशांना आवश्यकतेनुसार गाळे उपलब्ध करवून देण्यात येतील, अशी माहिती घोसाळकर यांनी दिली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com