सिंहगड किल्ल्यावर दरड कोसळून ट्रेकरचा मृत्यू

कल्याण दरवाज्या जवळ तटबंदीच्या खालच्या भागातील दरड पायवाटेवर कोसळल्याची घटना काल घडली होती. दुर्दैवाने ढिगाऱ्याखाली सापडून हेमंग लागा वय 27 या ट्रेकरचा मृत्यू झाला आहे.
Pune News
Pune NewsSaam Tv

सचिन जाधव

पुणे - सिंहगड किल्ल्यावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका ट्रेकरचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कल्याण दरवाज्या जवळ तटबंदीच्या खालच्या भागातील दरड पायवाटेवर कोसळल्याची घटना काल घडली होती. दुर्दैवाने ढिगाऱ्याखाली सापडून हेमंग लागा वय 27 या ट्रेकरचा मृत्यू झाला आहे.

स्थानिक नागरिकानी अथक प्रयत्न केल्यानतर आज पहाटे हेमंगचा मृतदेह सापडला. दाट धुके असताना सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत चार ते पाच ट्रेकर्स थोडक्यात बचावले आहे. मात्र एक जण बेपत्ता झाला होता.

हे देखील पाहा -

शनिवारी सकाळी दाट धुके असताना 9च्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. बराच वेळ झाला तरी गडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या हेमंत यांच्याशी संपर्क झाला नाही. त्यानंतर हेमंत यांच्या घरच्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर गडावर शोधाशोध केल्यानंतर रात्री उशिरा ही बाब सामोर आली.

Pune News
हिम्मत असेल आमदारांनी राजीनामे द्यावं; संजय राऊतांचे बंडखोर आमदारांना ओपन चॅलेंज

काल सकाळी सहा वाजता 'सिंहगड एथिक्स ट्रेक' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सुमारे तीनशे स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. सिंहगड पायथ्याशी असलेल्या आतकरवाडी-गोळेवाडी चौक- कोंढणपूरफाटा-कोंढणपूर- कल्याण - कल्याण दरवाजा - नरवीर तान्हाजी मालुसरे समाधी - पुणे दरवाजा - गाडीतळ आतकरवाडी असा या स्पर्धेचा मार्ग होता.काल दरड कोसळल्याने किल्ल्यावरील कल्याण दरवाजाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. हेमंत यांच्या जाण्याने ट्रेकर ग्रुपमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com