Mumbai: ३०-४० क्षमतेच्या वसतिगृहात १५० विद्यार्थ्यांचं स्थलांतर; आदिवासी विकास विभागाचा भोंगळ कारभार

Tribal Students Hostel Issue In Mumbai : याचा निषेध व्यक्त करत आदिवासी टायगर सेनेने नवापूर तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना निवेदन देऊन विद्यार्थ्यांना चांगली सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी शासनाकडे केली आहे.
Tribal Students Hostel Issue
Tribal Students Hostel Issueदिनू गावित

मुंबई: आदिवासी विकास विभागाचा (Department of Tribal Development) भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. मुंबईतील गोरेगाव (Goregaon, Mumbai) वसतिगृहाची (Hostel) इमारत धोकादायक असल्याची नोटीस ऐन पावसाळ्यात तेही विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असताना दिली आहे. १५० विद्यार्थ्यांना जोर जबरदस्तीने पोलीस बंदोबस्तात स्थलांतरित करण्याचा अजब कारभार आदिवासी विकास विभागाने चालवला आहे. याचा निषेध व्यक्त करत आदिवासी टायगर सेनेने नवापूर तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना निवेदन देऊन विद्यार्थ्यांना चांगली सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी शासनाकडे केली आहे. (Tribal Students Latest News)

हे देखील पाहा -

आदिवासी विकास विभागाने ३० ते ४० विद्यार्थी राहू शकतील अशा जागेत १५० विद्यार्थ्यांचे स्थलांतर केल्याने विद्यार्थ्यांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. तसेच पर्यायी व्यवस्था केलेल्या ठिकाणाहून कॉलेजला जाण्यासाठी प्रवासाची सोय योग्य नाही. वस्तीगृहातील अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेत असल्याने ऐन परीक्षेच्या कालावधीत वस्तीगृहाचे स्थलांतर केल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. इमारत धोकादायक होती, तर आदिवासी विकास विभागाने आधीच विद्यार्थ्यांना पर्यायी व्यवस्था करायची होती, एवढे दिवस झोपले होते का? असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

Tribal Students Hostel Issue
Kargil Vijay Diwas : कारगिलचा शेरशाह कॅप्टन विक्रम बत्रा यांच्याबाबत 'या' गोष्टी माहित असायलाच हव्यात!

या स्थलांतरित विद्यार्थ्यांना पर्यायी आणि योग्य सुविधा उपलब्ध करुन न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आदिवासी टायगर सेनेने दिला आहे. निवेदन देताना अतुल गावीत, संदीप गावीत, धर्मेश मावची, रोहित गावीत, आकेश गावीत, अविनाश गावीत, किरण वळवी, विनेश गावीत, मनोहर गावीत, अरविंद गावीत, तेजस वसावे आदी उपस्थित होते.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com