‘जय भीम’ची पुनरावृत्ती! आदिवासी महिलांना चोर समजून पोलिसांकडून बेदम मारहाण (पहा Video)

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जयभीम चित्रपटात Jay Bhim Movie मांडलेल्या कथेत पोलिस यंत्रणेचे मांडलेले भयाण वास्तवाची प्रचीती वसईत पाहायला मिळाली आहे.
‘जय भीम’ची पुनरावृत्ती! आदिवासी महिलांना चोर समजून पोलिसांकडून बेदम मारहाण (पहा Video)
‘जय भीम’ची पुनरावृत्ती! आदिवासी महिलांना चोर समजून पोलिसांकडून बेदम मारहाण (पहा Video)चेतन इंगळे

चेतन इंगळे

विरार: नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जयभीम चित्रपटात Jay Bhim Movie मांडलेल्या कथेत पोलिस यंत्रणेचे मांडलेले भयाण वास्तवाची प्रचिती वसईत Vavsai पाहायला मिळाली आहे. पालघरच्या ग्रामीण भागातील आदिवासी महिला Tribal Women पोटाची खडगी भरण्यासाठी आलेल्या महिलांना चोर समजून पोलिसांनी Police बेदम मारहाण केली आहे. विशेष बाब म्हणजे पोलिसांनी या महिलांना केवळ संशयावरून ताब्यात घेवून त्यांना मारहाण करून सोडून दिले. यांना ताब्यात घेतल्याची कोणतीही नोंद पोलीस दफ्तरी केली नाही.

पहा व्हिडीओ-

कासा परिसरात राहणाऱ्या बेबी नारायण वावरे, दीपिका दिनेश वावरे, विमल माणक्या पुंजारा, सोनम सबू भोईर,  सीता संताराम भोईर, तारु सुभाष डोकफोडे मूळ राहणार कावडास कासा आता कामासाठी पापडी तलाव कोळीवाडा या ठिकाणी राहतात. या महिला वसईत बिगारी काम करतात.  

पुन्हा बाजारात न दिसण्याची धमकी;

शुक्रवारी या महिला पापडी येथे बाजार भरत असल्याने घरी जाताना बाजारहाट करत असताना काही नागरिकांनी या चोरी करण्यासाठी आल्याचे सांगत पोलिसांना माहिती दिली. यावेळी पोलिसांनी त्यांना रिक्षात भरून पापडी चौकीत नेले. येथील सहायक पोलीस निरीक्षक वाघ आणि त्यांच्या साथी पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना दंडुक्याने मारहाण करत चोरीचा आरोप लावला. तसेच त्यांना पुन्हा बाजारात न दिसण्याची धमकी दिली.

‘जय भीम’ची पुनरावृत्ती! आदिवासी महिलांना चोर समजून पोलिसांकडून बेदम मारहाण (पहा Video)
लहान मुलांसोबत 'ओरल सेक्स' करणं गंभीर गुन्हा नाही- उच्च न्यायालय

...पण कोणतीही मारहाण केली नसल्याचा दावा;

तर, महिलांनी या संदर्भात आदिवासी संघटना यांना माहिती दिल्यावर त्यांनी या प्रकरणी पोलिसांना जाब विचारला असता पोलिसांनी केवळ समज देण्यासाठी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना कोणतीही मारहाण केली नसल्याचा दावा केला आहे. तर वसई विरार महानगर पालिकेच्या आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय तपासणीत महिलांच्या दंडावर मारहाण झाल्याचे समोर आले आहे.  

उपायुक्तांकडून प्रकरणाच्या चौकशीचे आदेश;

यासंदर्भात माहिती देताना परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी माहिती दिली की, या प्रकरणाचा तपास वसई साहायक पोलीस आयुक्त यांच्याकडे दिला आहे. त्यांच्या अहवालानुसार पुढील कारवाई केली जाईल. तर या महिलांनी आपल्याला न्याय मिळावा यासाठी श्रमजीवी संघटना, लालबावटा संघटनेने पुढाकार घेतला असून दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com