विधवा महिलांनीही वटपौर्णिमा साजरी करावी : तृप्ती देसाई

विधवा महिलांसाठी काही विशेष सण समांरभ नसतो. या पार्श्वभूमीवर विधवा महिलांनीही वटपौर्णिमा साजरी करावी, असा सल्ला सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली आहे.
trupti desai
trupti desai Saam Tv

मुंबई : भारतीय संस्कृतीत सौभ्याग्याला अनन्यसाधारण महत्व आहे. भारतीय संस्कृतीत (Culture) महिलेला आदराचे स्थान आहे. महाराष्ट्रातील काही महिला आवडीने मंगळागौरी देखील साजरा करतात. वटपौर्णिमा हा सण राज्यात मोठ्या उत्साहाने साजरा करतात. आज सकाळपासून राज्यातील विविध जिल्ह्यात महिला वडाची पूजा करत आहे. मात्र, विधवा महिलांसाठी काही विशेष सण समांरभ नसतो. या पार्श्वभूमीवर विधवा महिलांनीही वटपौर्णिमा साजरी करावी, असे मत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी व्यक्त केले आहे.

trupti desai
सुप्रिया सुळे दिलखूलास... म्हणाल्या, ग्लासात ग्लास छत्तीस ग्लास सदानंदराव आहेत फर्स्ट क्लास

तृप्ती देसाई म्हणाल्या,' वटपौर्णिमा साजरी करणाऱ्या महिलांनी वडाच्या झाडाच्या तोडलेल्या फांद्याची पूजा करू नये. त्यापेक्षा एक वडाचे झाड लावून त्याचे कायम पालन पोषण करण्याचा वटपौर्णिमेदिवशी संकल्प करावा. जशी आपल्याला सत्यवानाची सावित्री समजली तशी जोतिबाची सावित्रीही समजली आहे.म्हणून सत्यवानाच्या सावित्रीचा जयघोष फक्त वटपौर्णिमेच्या दिवशी केला जातो. ज्योतिबाची सावित्री प्रत्येकाच्या हृदयात आहे. आज मुली शिकत आहेत. प्रगती करत आहेत, महिला उच्चपदावर काम करत आहेत'.

ज्या विधवा महिलांची इच्छा वटपौर्णिमेचे व्रत आणि पूजा करण्याची आहे. त्यांनी पुढाकार घेऊन वटपौर्णिमा साजरी करावी. कारण हा सण महिलांचा आहे. फक्त सुवासिनी म्हणून इतरांशी भेदभाव करणाऱ्यांचा नाही,असेही तृप्ती देसाई म्हणाल्या.

trupti desai
पानांपासून- फळांपर्यंत आरोग्यासाठी गुणकारी ठरेल वटवृक्ष

सुप्रिया सुळेंचे विधवा महिलांसमवेत वटपौर्णिमेचे पूजन

खासदार सुप्रिया सुळे या अमरावती जिल्हा दाै-यावर आहेत. आज अमरावती येथे सुळे यांनी महिलांसमवेत वटपाेर्णिमा साजरी केली. या सणात विधवा महिलांना देखील त्यांनी सहभागी करुन घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी आज अमरावती येथे विधवा महिलांसमवेत वटपौर्णिमेचे पूजन (vat purnima) करून एक नवा पायंडा अमरावतीत रोवला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com