बुटांवरून दहिसर पोलिसांकडून दोघांना अटक; 28 हुन अधिक घरफोड्या उघडकीस

या आरोपींकडू साडे बारा लाखांचे सोने चांदीचे दागिने पोलिसांना मिळाले आहेत.
Mumbai News
Mumbai NewsSaam Tv

मुंबई - दहिसर पोलिसांनी (Police) घरफोड्या करणाऱ्या दोन आरोपींना त्यांच्या पायातील बुटांच्या मदतीने अटक केली आहे. या आरोपींकडू साडे बारा लाखांचे सोने चांदीचे दागिने पोलिसांना मिळाले आहेत. दहिसर परिसरातील एका घरात या चोरटांनी डल्ला मारला होता.घरातील लोक बाहेर गेले असता, दिवसाढवळ्या या चोरट्यांनी घरातील सर्व सोने व रोकडवर हात मारून पसार झाले.

हे देखील पाहा -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या परिसरात सीसीटीव्ही व सुरक्षारक्षक नसतात त्या परिसरात हे चोरटे रेकी करत घरातील लोक बाहेर गेल्यावर चोरी करत होते. पोलिसांनी परिसरातील 76 सीसीटीव्ही तपासले असता आरोपींचे केवळ दुचाकी व पायातील बूट दिसत होते. केवळ पायातील बुटांवरून पोलिसांनी आरोपींना अटक केली. पोलीस तपासात आरोपी अनंत कांबळे(52) न्यानेश्वर बंगरे (37) हे नवी मुंबई मध्ये राहत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर मुंबई,वसई,नवी मुंबई येथे 28 पेक्षा जास्त घरफोडीच्या आरोप आहेत.y-

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com