मुंबई पोलिसांची धडक कारवाई; आधारकार्डची गोपनिय माहिती चोरून विक्री करणारी टोळी गजाआड

सदर गुन्ह्याचा पुढील तपास कक्ष ६ कार्यालयातील पोलीस निरीक्षक प्रशांत पवार करत आहेत.
Mumbai Police
Mumbai Police Saam TV

मुंबई : डिजिटल युगात ऑनलाईन फसवणुकीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सायबर ठग लोकांना फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या शोधत असतात. मुंबईत असंच एक प्रकरण उघडकीस आलं आहे. ज्यामध्ये आधारकार्डची गोपनिय माहिती चोरून ती बेकायदेशीरपणे विकणाऱ्या दोघा आरोपींना पोलिसांनी (Mumbai Police) बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, UIDAI (AADHAR) ची CDIR ची या संगणक प्रणालीमधील नागरिकांच्या आधार कार्डाची गोपनीय माहिती चोरी करून त्याची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा, कक्ष ६ने रणजीत चव्हाण यांच्या फिर्यादीनंतर ही धडक कारवाई केली आहे. (Latest Marathi News)

Mumbai Police
'२६/११ हल्ल्याची माहिती आपल्याकडे आधीच होती, पण...'; देवेंद्र फडणवीसांनी ठेवलं उणीवेवर बोट

पोलीस निरीक्षक रविंद्र साळुंखे यांना माहिती मिळाली होती की, एक इसम त्याच्या साथीदारांसह Tracenow.co.in व www.fonivotech.com अशा नावाच्या दोन वेबसाईट विकसित केल्या आहेत. या अॅप्लीकेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र, दिल्ली व गुजरात राज्यातील नागरिकांचे त्यांच्या नावावरून किंवा आधारकार्ड लिंक मोबाईल क्रमांकावरून त्यांचे संपूर्ण नाव, गाव, पत्ता सर्व जुने बंद झालेले व चालू असलेले मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी, जन्म तारीख, कुटुंबातील सदस्य त्यांची माहिती, त्यांचे आधारकार्ड लिंक मोबाईल नंबर याबाबत इंत्यभूत माहिती मिळते.

वरील वेबसाईट वरून कशाप्रकारे माहितीची देवाण घेवाण होते किंवा खरेदी विक्री होते यादृष्टीने आधी पोलिसांना माहिती गोळा केली. सातत्याने सलग दोन माहिने प्रयत्न करून, आरोपी इसमाचे कार्यालय व निवासस्थान याबाबत माहिती मिळवली. त्यावरून आरोपी इसमाचे कार्यालय व निवासस्थान याठिकाणी निगराणी ठेवण्यात येत होती.

Mumbai Police
अंधेरी-म्हाडा परिसरात बंद बंगल्यावर दरोडा; पोलिसांनी चोरांच्या मुसक्या आवळल्या

दरम्यान पोलीस पथकाने त्यादृष्टीने अधिकाअधिक प्राथमिक पुरावा आणि इतरही गोपनीय माहिती गोळा करून पुराव्याच्या आधारावर चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुढील कारवाईसाठी पोलिसांची दोन पथके तयार करून एकाच वेळी आरोपीचे कार्यालय व निवासस्थान येथे छापा टाकला.

तेथून सर्व कॉम्युटर, लॅपटॉप, मोबाईल, सिम कार्ड पंचनामा करून जप्त करण्यात आले. गुन्ह्यात दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने आरोपींना १२ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास कक्ष ६ कार्यालयातील पोलीस निरीक्षक प्रशांत पवार करत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com