Ulhasnagar: मोठी बातमी! उल्हासनगरमध्ये दोन बांगलादेशी घुसखोरांना अटक, ठाणे एटीएसच्या कारवाईमुळे खळबळ

उल्हासनगरमध्ये दोन बांगलादेशी घुसखोरांना बेड्या ठोकल्याची मोठी बातमी सध्या समोर येत आहे. या कारवाईत एका अल्पवयीन मुलीलाही ताब्यात घेतले आहे.
Vitthalvadi police Station
Vitthalvadi police StationSaamtv

अजय दुधाणे, उल्हासनगर

Mumbai: उल्हासनगरमध्ये दोन बांगलादेशी घुसखोरांना बेड्या ठोकल्याची मोठी बातमी सध्या समोर येत आहे . ठाणे एटीएसने ही कारवाई केली आहे. या कारवाईत एका अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्यात आलं असून एक जण पळून गेला आहे. (Mumbai News)

Vitthalvadi police Station
Ind vs NZ ODI Series: गोलंदाजांची कमाल! अवघ्या 15 धावा अन् न्यूझीलंडचा निम्मा संघ गारद; शमीचा जबरदस्त कॅच Video

याबाबत अधिक माहिती अशी की, उल्हासनगरच्या कॅम्प ४ मधील कृष्णा नगर परिसरात काही बांगलादेशी नागरिक अवैधरित्या वास्तव्य करत असल्याची माहिती मुंबई एटीएसच्या ठाणे युनिटला मिळाली होती. त्यानुसार एटीएसच्या पथकाने शुक्रवारी उल्हासनगरमध्ये धाड टाकत तीन बांगलादेशींना ताब्यात घेतलं.

यापैकी लिटन शेख आणि शुकर अली नाजीर शेख या दोघांना पोलिसांनी अटक केली, तर त्यांच्यासोबत असलेल्या एका १६ वर्षीय मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

Vitthalvadi police Station
Aurangabad News : औरंगाबाद बनलंय दुचाकी चोरीचे हॉटस्पॉट; गेल्या वर्षी 'इतक्या' वाहनांची चोरी

दरम्यान, या सगळ्यांना उल्हासनगरमध्ये आश्रय देणारा खलील मंडल हा मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात परकीय नागरिक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास विठ्ठलवाडी पोलीस आणि मुंबई एटीएस कडून सुरू आहे. (Thane Police)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com