Mumbai Accident : सायनमध्ये भरधाव कारची दुभाजकाला धडक, दरवाजा लॉक झाल्याने दोन भावांचा होरपळून मृत्यू

Mumbai Sion Car Accident : अजय वाघेला आणि प्रविण वाघेला अशी दोन्ही भावांची नावे आहेत.
Mumbai Accident
Mumbai AccidentSaam TV

सचिन गाड

Mumbai News :

मुंबईत एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात दोन भावाचा होरपळून मृत्यू झाला आहे. सायन कार दुभाजकला धडकून हा अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे सायन येथे कार दुभाजकाला धडकून हा अपघात झाला. अपघात होताच गाडीने क्षणात पेट घेतला. अपघातानंतर गाडीचे दरवाजेही आपोआप लॉक झाले. गाडीचे दरवाजे लॉक झाल्याने गाडीतून प्रवास करत असलेल्या दोघा भावांना बाहेरच पडता आले नाही. (Latest Marathi News)

Mumbai Accident
Mumbai News : गणपतीची वर्गणी मागायला गेले, थेट तुरुंगात पोहोचले; साकीनाका परिसरातून तिघांना अटक

गाडीने पेट घेतल्याने कारच्या आतचा दोन्ही भावांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी आहेत. अजय वाघेला आणि प्रविण वाघेला अशी दोन्ही भावांची नावे आहेत. (Mumbai News)

Mumbai Accident
Beed Accident: दुर्दैवी घटना! बीडमध्ये पिकअप- दुचाकीचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू; १ जखमी

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मात्र मदत पोहचण्यापूर्वीच गाडी आगीत जळून खाक झाली होती. घाटकोपरला पार्टी करून मरीना ड्राईव्हला फेरफटका मारण्यासाठी जात असताना हा अपघात झाला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com