चाकूचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार करणारे आरोपी पोलिसांच्या अटकेत

धारावी पोलिसांकडून बलात्काराच्या दोन्ही आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.
चाकूचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार करणारे आरोपी पोलिसांच्या अटकेत
Dharavi Police StationSaam Tv

मुंबई - गेल्या आठवड्यात मुंबईच्या (Mumbai) धारावी (Dharavi) परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली होती. मुंबईतील धारावी परिसरात १९ वर्षीय विवाहित महिलेवर चाकूचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. ११ मे रोजी या प्रकरणाचा धारावी पोलिसांनी (Police) एफआयआर नोंदवला होता. सदर प्रकरणात धारावी पोलिसांकडून बलात्काराच्या दोन्ही आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.

हे देखील पाहा -

दोन्ही आरोपी मुंबईतील विलेपार्ले पश्चिमेतील प्रेम नगर येथील रहिवासी आहेत. जेव्हा ही घटना घडली तेव्हा महिला घरात झोपली होती. घराचा दरवाजा उघडा होता, त्याचा फायदा घेत २ आरोपी घरात घुसले. पीडित महिलेचे सासरे घराचा दरवाजा न बंद करता घरा बाहेर फिरायला गेले असता घराचा दरवाजा उघडा राहिला.

दोन्ही आरोपींनी पीडितेला चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला. आरोपींनी ओळख लपवण्यासाठी तोंडाला रुमाल बांधला होता. पीडित महिलेने सांगितले की, एक आरोपी मोबाईलवर व्हिडिओ बनवत होता, पीडित महिलेने सांगितले की, दोघांचे वय ३० ते ३५ वर्षांच्या दरम्यान आहे.

Dharavi Police Station
बाबा बर्फानी यांचा यंदाचा पहिला फोटो, यात्रेला 30 जूनपासून सुरुवात

या प्रकरणी धारावी पोलीस ठाण्यात बुधवारी ११ मे रोजी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध आयपीसी कलम ३७६,३७६ (डी), ४२५, ३५४, (अ) ३५४ (ब), ३५४ (डी), ५०६ (२) आणि आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता . आरोपींना पकडण्यात धारावी पोलिसांना यश आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com