Pune : साता-याहून पुण्याला निघालेल्या ट्रकला अपघात; युवकाने जीव वाचविण्यासाठी तलावात मारली उडी

नवीन कात्रज बोगदा ते नवले पुल परिसरातील घटना.
Pune, Pune Mumbai Highway Accident News
Pune, Pune Mumbai Highway Accident Newssaam tv

Pune Mumbai Highway Accident News : साता-याहून पुण्याला निघालेल्या ट्रेलर ट्रकचा अपघात आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास पुणे मुंबई महामार्गावर झाला. या अपघातात मदत कार्य करण्यासाठी धावलेल्या युवकाने स्वत:चा जीव जाऊ शकताे अशी शंका निर्माण झाल्याने त्याने दरीपुलावरुन खाली तलावात उडी मारली.

हा अपघात आज पहाटेच्या सुमारास नवीन कात्रज बोगदा ते नवले पुल दरम्यान जांभुळवाडी येथील दरी पुलाजवळ झाला. प्राथमिक माहितीनूसार पहाटे पावणे चार वाजता साताराहून (satara) मोठा ट्रेलर ट्रक (एम एच ४६ - २९५०) पुण्याच्या (pune) दिशेने येत होता. जांभूळवाडी येथील दरी पुलाजवळ भरधाव ट्रक पलटी झाला.

Pune, Pune Mumbai Highway Accident News
Satara Pune Highway : साता-याहून पुण्याला जाणा-या वाहतूकीच्या मार्गात ३१ डिसेंबरपर्यंत माेठा बदल; जाणून घ्या कारण

या घटनेची माहिती फायर ब्रिगेडला मिळताच पथक मदतीसाठी घटनास्थळी पाेहचले. ट्रकच्या केबिनमधे जखमी अवस्थेत असलेल्या चालकाला त्यांनी धीर देत. त्याला सुखरुप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. जवान शिवाजी मुजूमले व शिवाजी आटोळे यांनी तातडीने दलाकडील स्प्रेडर व कटर या उपकरणाच्या मदतीने आणि एका क्रेनच्या साह्याने जखमी चालकाला पंधरा मिनिटात जखमी अवस्थेत बाहेर काढले. त्यानंतर त्यास तत्काळ उपचाराकरिता रुग्णवाहिकेतून रुग्णालयात (hospital) पाठविले.

Pune, Pune Mumbai Highway Accident News
Swasthyam 2022 : रिलॅक्स अन् फ्रेश मूडसाठी 'स्वास्थ्यम्'

हा अपघात घडताना ताे एक दुचाकीस्वाराने पाहिला. ताे तातडीने मदतीसाठी धावला. परंतु ट्रेलरने काही प्रमाणात पेट घेत असल्याचे पाहताच दुचाकीस्वाराने घाबरुन स्वतचा जीव वाचण्याकरिता दरीपुलावरुन खाली तलावात उडी मारली. जवान तेथे दाखल झाल्यानंतर काही वेळाने मदतीसाठी त्याच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यावेळी दलाचे जवान व तेथे उपस्थित नागरिक यांच्या मदतीने त्या दुचाकीस्वारास ही जखमी अवस्थेत वर काढण्यात आले.

Pune, Pune Mumbai Highway Accident News
Kass Pathar : प्रतापगडानंतर कास पठारावर जिल्हाधिका-यांची धडाकेबाज कारवाई; दहा वर्षानंतर स्थानिकांत आनंद

दरम्यान या अपघाताचे नेमके कारण व दोन्ही जखमींची नावे समजू शकलेली नाहीत. या अपघातामुळे (accident) रस्त्यावर वाहनातील तेल पडल्याने इतर वाहने घसरुन पडण्याची शक्यता असल्याने जवानांनी त्या ठिकाणी माती टाकून धोका दुर केला आहे.

या कामगिरीत सिंहगड अग्निशमन केंद्र अग्निशमन अधिकारी प्रभाकर उम्राटकर व वाहनचालक ज्ञानेश्वर बाठे तसेच तांडेल शिवाजी मुजूमले, फायरमन शिवाजी आटोळे, मदतनीस दिगंबर वनवे, कल्पेश बानगुडे, राजेंद्र भिलारे यांनी तसेच "पीएमआरडीए" अग्निशमन दल यांचे जवान, पोलिस व स्थानिक नागरिकांनी जखमींना (injured) मदतीचा हात दिला.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com